औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने अधिसभा व विद्यापरिषदेचा निवडणूकीचा दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम बुधवारी घोषित झाला आहे. अधिसभेच्या २९ व विद्या परिषदेच्या ८ जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान आणि १३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळ आदी प्राधिकरणाच्या निवडणुका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गाच्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजीत तर निकाल २८ नोव्हेंबर रोजी आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिसभेच्या २९ जागांसाठी उर्वरित गटातून मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये प्राचार्य व महाविद्यायीन प्राध्यापक गटातून प्रत्येकी १० जागांसाठी तर संस्थाचालक गटातून ६ व विद्यापीठ शिक्षकातून ३ जागांसाठी तसेच विद्या परिषदेच्या ८ जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
शुक्रवार पासून १९ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २० ते २१ नोव्हेंबर छाननी, २२ नोव्हेंबर रोजी वैध अवैध अर्ज यादी जाहीर होईल. २३ नोव्हेंबर रोजी अपील, २४ नोव्हेंबर रोजी अपिलांवर सुनावणी, २५ नोव्हेंबर रोजी वैध अवैध अंतिम यादी, माघार घेण्यासाठी २७ नोव्हेंबंर रोजी ५ वाजेपर्यंत मुदत असणार आहे. तर त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. १० डिसेंबर रोजी मतदान तर १३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. पदवीधर अधिसभा निवडणूकीसंदर्भात १४ अपिले दाखल करण्यात आली. या अपिलावर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी बुधवारी दुपारी १२ ते २ या दरम्यान व्यवस्थापन परिषद कक्षात सुनावणी घेतली.
११ नोव्हेंबर रोजी माघार, चित्र होईल स्पष्ठदुसऱ्या टप्प्यातील गटाच्या अंतिम मतदार याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत मतदार याद्या जाहीर झालेल्या नव्हत्या. पदवीधर प्रवर्गातील पहिल्या टप्प्यातील दहा जागांसाठी १० नोव्हेंबर रोजी वैध-अवैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० ते ५ दरम्यान अर्ज मागे घेता येतील. ११ रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल. त्यानंतर निवडणूकीतील चित्र स्पष्ठ होईल.
औरंगाबादेतील ४८ टक्के मतदारपदवीधर गटातून मतदानासाठी ३६ हजार ८८२ मतदारांची चार जिल्ह्यांतून नोंदणी झालेली आहे. त्यापैकी सर्वाधिक १७ हजार ७६५ (४८.१६ टक्के) मतदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यासाठी १६ मतदान केंद्र जिल्ह्यात असतील. बीड जिल्ह्यात १२ हजार ५९३ मतदार असून, ते १६ केंद्रांवर, जालना जिल्ह्यात ३ हजार ९९३ मतदार असून, ते ९ केंद्रांवर तर उस्मानाबाद जिल्ह्यात २ हजार ५३१ मतदार असून, ते १० केंद्रांवर मतदान करतील. चार जिल्ह्यांतील ५१ मतदान केंद्रांवर हे मतदान होईल.