परिणामी आज, दि. १८ मार्च रोजीची महापौर व उपमहापौरांची निवडणूक ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच होणार, हे स्पष्ट झाले आहे.
न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर बुधवारी याचिकेची सुनावणी झाली.
रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ‘ऑनलाईन’ निवडणुकीच्या घोषणेला खंडपीठात आव्हान दिले होते.
राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या. मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली होती. नुकत्याच पिंप्री-चिंचवड आणि नागपूर महापालिकेच्या निवडणुका सभागृहात झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव महापालिकेची निवडणूक ऑनलाईन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अमरजितसिंह गिरासे, ॲड. योगेश बोलकर, ॲड. ज्ञानेश्वर बागुल व ॲड. विष्णू मदन पाटील यांनी; तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.