छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत ई-वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातही ई-दुचाकींची संख्या वेगाने वाढत असून, ही संख्या १६ हजारांवर गेली आहे. मात्र, अनेक कारणांनी ई-दुचाकी बंद पडली तर मेकॅनिकची शोधाशोध करण्याची वेळ ई-वाहनधारकांवर ओढवते.
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या किती?चारचाकी : ८७१दुचाकी : १६,१६४ऑटो : ४२३बस : ७
महावितरणचे २ चार्जिंग स्टेशनशहरात महावितरणचे सूतगिरणी चौक येथे एक आणि चिकलठाणा एमआयडीसी येथे एक चार्जिंग स्टेशन आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी खासगी चार्जिंग स्टेशनही साकारण्यात आली आहेत.
दुचाकीचे पार्ट्स मिळेनातई-दुचाकीचे पार्ट्स बाहेर सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी शोरूमलाच जावे लागते. अत्यावश्यकप्रसंगी ‘जुगाड’ करून ई-दुचाकीची दुरुस्ती करावी लागत असल्याचे एका मेकॅनिकने सांगितले.
मेकॅनिकचीही अडचणशहरात आजघडीला नोंदणीकृत दुचाकी मेकॅनिकची संख्या अडीच हजार आहे. मात्र, ई-दुचाकींची दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकची अडचण आहे. मेकॅनिक मिळत नाही म्हणून थेट शोरूमच गाठावे लागते.
कंपन्यांची मक्तेदारी दिसतेई-वाहनांची दुरुस्ती करण्याच्या बाबतीत कंपन्यांची मक्तेदारी पहायला मिळते. कारण अनेक स्पेअर पार्ट बाहेर मिळत नाहीत, त्यासाठी शोरूमलाच जावे लागते. ई-वाहनांची दुरुस्ती करणारे मेकॅनिकही सध्या फारसे नाहीत.- सय्यद चाँद, अध्यक्ष, टुव्हिलर मेकॅनिक असोसिएशन