लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे. हे गाºहाणे पुढाºयांकडे मांडले जात असल्याने तेही संतप्त असून एकप्रकारे शेतकºयांना नागवण्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.यंदा आधीच पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनला याचा मोठा फटका बसला आहे. मालाला भाव नसल्याने शेतकºयांनी त्याची विक्रीही केली नाही. मात्र महावितरणने डीपी जळालेल्या गावातील शेतकºयांना चालू तीन व नवीन तीन असे सहा हजारांचे बिल भरणे सक्तीचे केल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे जिल्हाभर ओरड सुरू झाली आहे. काही ठिकाणी विविध पक्ष आंदोलकात्मक पवित्र्यात आहेत.आज आ.संतोष टारफे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन भेट दिली. कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्याशी चर्चा केली. तर कृषीपंपांचे भारनियमन तत्काळ बंद करा, शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बंद करा, योग्य दाबाचा व सुरळीत वीजपुरवठा करा, नवीन डीपी उपलब्ध करून देण्यास विलंब करू नका, अशी मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, गयबाराव नाईक, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, बापूराव बांगर, भागोराव राठोड, संजय राठोड, डॉ.माणिक देशमुख, सुनील दुबे, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.
वीजबिल वसुली; शेतकरी कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:38 AM