उस्मानाबाद : अचानक ‘हाय व्होल्टेज’चा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरासह दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले़ या घटनेत हजारो रूपयांचे नुकसान झाल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे़ ही घटना रविवारी दुपारी शहरातील निंबाळकर गल्ली, गवळी गल्ली भागात घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीज कंपनीकडून रविवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील गवळी गल्ली, निंबाळकर गल्ली परिसरात अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा झाला़ अचानक ‘हाय व्होल्टेज’ वीजपुरवठा झाल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील, दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले़ यात मन्मथ पाळणे यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, एका दैनिकाच्या कार्यालयातील संगणक, रेवणकर ज्वेलर्स या दुकानातील एलईडी बल्ब, ट्यूब जळाली़ श्री गणेश ज्वेलर्स दुकानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, तुषार निंबाळकर यांच्याव घरातील टीव्ही संच, अभयकुमार वालचंद शहा यांच्या दुकानातील बॅटऱ्या, विजेची उपकरणे जळून खाक झाली़ याशिवाय इतर ग्राहकांच्या घरातील, दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ वीज कंपनीच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमधून संताप व्यक्त होत असून, नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे़
‘हाय व्होल्टेज’मुळे विद्युत उपकरणे खाक
By admin | Published: March 26, 2017 11:10 PM