वाळूज महानगर : औद्योगिक क्षेत्र असो की घरगुती जोडण्या, महावितरण वीज ग्राहकांना तत्पर वीजसेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीजजोडणी देण्यासाठी सज्ज आहे. महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यात १ डिसेंबर, २०१८ ते १ डिसेंबर, २०२३ या पाच वर्षे कालावधीत सर्व वर्गवारींतील सरासरी ७,९७,८२१ ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यात ५,९३,१७८ घरगुती वीजजोडण्यांचा समावेश आहे.
औद्योगिक क्षेत्रासह महावितरण दर्जेदार, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सदैव सज्ज आहे. नव्या वीजजोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांनी नव्या वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे, याची माहिती देतात. त्यानुसार, पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले, त्यांना चोवीस तासांत तर ग्रामीण भागांत ४८ तासांत वीजजोडण्या देण्यावर भर देण्यात आला.
मंडळ कार्यालय - नवीन जोडण्या- छत्रपती संभाजीनगर शहर - ७८,२५१- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण - १,१९,६४५- जालना - ७९,११२
छत्रपती संभाजीनगर परिमंडळ - २,७७,००८- बीड - ९८,२७५- धाराशिव - ७२,३९३- लातूर - १,१३,१५५
लातूर परिमंडळ - २,८३,८२३- हिंगोली - ४८,६३४- नांदेड - १,३१,९८७ - परभणी - ५६,३६९
नांदेड परिमंडळ - २,३६,९९०मराठवाडा एकूण - ७,९७,८२१
जनतेच्या प्रश्नांकडेही लक्ष हवे...वीजगळती रोखण्यासाठी ही योजना उत्तम आहे. सौरऊर्जेमुळे वीजबिलात बचतीचा मार्ग सापडला आहे, परंतु अखंड विजेबाबत केंद्रातील बैठकीतील घोषणेची मराठवाड्यात अंमलबजावणी गरजेची आहे.- सुभाष पाटील पांडभरे
दलाल अथवा मध्यस्थ नकोवीजजोडणी आवश्यक असल्यास त्या ठिकाणच्या जागेवर वीजबिलाची थकबाकी नसावी. वीजचोरीचा दंड प्रलंबित असू नये. नवीन वीजजोडणीसाठी दलाल अथवा मध्यस्थाशी संपर्क साधू नये. नागरिकांनी वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.- शांतिलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण.