शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

आज बारा तास वीज बंद

By admin | Published: June 06, 2014 12:52 AM

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागांत चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही.

औरंगाबाद : मागील महिनाभरापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागांत चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही. ही कृत्रिम पाणीटंचाई आणखी तीव्र करण्यात जीटीएल हातभार लावत आहे. उद्या शुक्रवार, दि.६ जून रोजी सिडको परिसर वगळता अन्य शहरातील वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जीटीएलने घेतला आहे. शहरातील १७४ फिडर बंद करण्यात येणार आहेत. यातील कटकटगेट, सुभेदारी व बजाजनगर फिडरवरील वीजपुरवठा सुमारे १० ते १२ तास बंद ठेवण्यात येणारआहे. पन्नालालनगर, जवाहर कॉलनी, भगवती कॉलनी, विश्वभारती कॉलनी, विष्णूनगर, मित्रनगर, श्रेयनगर, झांबड इस्टेट, उल्कानगरी, रवींद्रनगर, अरिहंतनगर, आकाशवाणी केंद्र, श्रीरामनगर, शिवशंकर कॉलनी, खिंवसरा पार्क, शहानगर, विवेकानंदपुरम, उस्मानपुरा, मित्रमंडळ हाऊसिंग सोसायटी, प्रतापनगर, ज्योतीनगर, दशमेशनगर, तापडियानगर, शहानूरवाडी, चाणक्यपुरी, दूध डेअरी परिसर, उस्मानपुरा, क्रांतीचौक, खोकडपुरा, रोकडिया हनुमान कॉलनी, बंजारा कॉलनी, लक्ष्मीनगर, शिवाजीनगर, ११, १२ व १३ वी योजना, आदित्यनगर, सूतगिरणी परिसर, आनंदनगर, भारतनगर, गुरुदत्तनगर, देवगिरी हिल्स, गणेशनगर.११ केव्ही मिलिंद फिडरवरील छावणी, लक्ष्मीनगर, शांतीनगर, ख्रिस्तनगर, भगतसिंगनगर, नंदनवन कॉलनी, पेठेनगर, पडेगाव, मित्रनगर, सुभाषपेठ, मिलिंद कॉलेज, गुलमोहर कॉलनी, निजाम बंगला या सर्व परिसरात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरवासीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.कुठे होणार विद्युत पुरवठा खंडित सेव्हन हिल परिसर, विद्यानिकेतन कॉलनी, इंदिरानगर (गल्ली नं. ३ ते ३०), सुराणानगर, जालना रोड, सुभाषचंद्र बोसनगर, शताब्दीनगर, पोलीस मेस, बाबर कॉलनी, एस. टी. कॉलनी, नेहरूनगर परिसर, कटकटगेट फिडरवरील नवजीवन कॉलनी, यादवनगर, एस. पी. आॅफिस, सिद्धार्थनगर, टी. व्ही. सेंटर चौक, रविनगर, सुभेदारी व वॉटर वॅक्स फिडरवरील सुभेदारी, वानखेडेनगर, मुजफ्फर कॉलनी, चाऊसनगर, एकतानगर, जटवाडा रोड, वाळूज परिसरातील बजाजनगर, मोहटादेवी परिसर, जयभवानीनगर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरीही जीटीएलचे मान्सूनपूर्व काम अजूनही सुरूच आहे. उल्लेखनीय म्हणजे २ एप्रिलपासून जीटीएलने मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घेतली; पण तीन महिने उलटूनही देखभाल, दुरुस्ती सुरूच आहे. शहरवासीयांनी छुप्या भारनियमनाचा फटका उन्हाळाभर सहन केला. उद्या ६ जून रोजी ३३ केव्ही पन्नालालनगर उपकेंद्र, ११ केव्हीच्या ७ फिडरवर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.