गोवंश जातीची जनावरे शहरात कत्तलीसाठी आणली आहेत, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाईची सूत्र फिरविली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुरेशी गल्लीतील बीमाई मस्जिदसमोर असलेल्या अलीम हरून शेख यांची चौकशी केली असता त्याच्या मालकीच्या जागेत बंदी करून ठेवलेली गोवंश जातीची अकरा जनावरे दिसून आली. यात सहा गायी, एक वासरू, दोन गोऱ्हे व दोन बैलांचा समावेश होता. या सर्व जनावरांची अंदाजे किंमत ही एक लाख २१ हजार अशी आहे. पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेऊन गोकुळधाम गो-शाळेत सोडून दिली, तर अलीम हरून शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक एस. जे. शेख, भगवान अरेकर, गुप्तवार्ता शाखेचे योगेश हरणे, पोहे. गणेश काथार, बीट अंमलदार अमित पाटील, सोमनाथ मुरकुटे यांनी कारवाई केली.
कत्तलीसाठी आणलेल्या अकरा जनावरांची पोलिसांनी केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:02 AM