शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अभिजात सौंदर्य लयास

By admin | Published: July 05, 2017 12:29 AM

औरंगाबाद : आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे.

मयूर देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे. त्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाची ना प्रशासनाला गरज वाटते, ना सामान्य नागरिकांना चिंता. त्यामुळेच तर ‘दख्खनचा ताज’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य लोप पावून तो विद्रूप अवस्थेतून आता एक शोकांतिका होऊ पाहत आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्राच्या ताज महालाची प्रतिकृती असली तरीही बीबी का मकबऱ्याचे स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्यही आहेच. गेल्या ३५० वर्षांपासून जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करणाऱ्या या अद्भुत स्थळाला भेट दिल्यावर त्याची दुरवस्था पाहून मात्र न राहून मनात येते की, कदाचित यामुळेच बीबी का मकबऱ्याला ‘गरिबांचा ताज महाल’ हे विशेषण लागले असावे.मकबऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच या शोकांतिकेची एक एक दुखरी बाजू समोर येऊ लागते. काळ्याशार पहाडाच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी पांढरा शुभ्र स्फटिकासमान भासणारा मकबरा आता मात्र आसपास मनमोहक हिरवळ दाटूनही तेजोभंग झाल्यागत उभा आहे. त्याची चमकदार शुभ्रता आता लोप पावली आहे. शहेनशहा औरंगजेबचा मुलगा आजमशहाने आई रबिया-उल-दुर्राणी ऊर्फ दिलरसबानो बेगम हिच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला. समाधीची मुख्य इमारत १९ फूट उंच आणि ७२ फूट लांबीच्या चौरसाकृती विशाल ओट्यावर उभी आहे.मकबऱ्याच्या अनन्यसाधारण सौंदर्यात भर घालण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. मकबऱ्याच्या निर्मितीसाठी लाल आणि काळे दगड, संगमरवर आणि स्टको प्लॅस्टर (गिलावा) वापरण्यात आले आहे. भिंतीवरील स्टको प्लॅस्टरवरील नक्षीकाम मकबऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, आता या गिलाव्याचे पापुदे्र वातावरणाचा मारा आणि भारतीय सर्वेक्षण खात्याच्या उदासीनतेने गळून पडत आहेत. संगमरवराचा शुभ्र परिणाम साधण्यासाठी वापरलेला गिलावा निघाल्यामुळे आतील दगड दिसत आहेत. पावसाचा मारा आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे भिंती काळ्या पडत आहेत. पांढऱ्या मकबऱ्यावर जागोजागी काळे ठिपके पडल्याने त्याचे सौंदर्यच बाधित झाले आहे. समाधीच्या चारही कोपऱ्यांवर आकर्षक नक्षीकामाने नटलेल्या अष्टकोनी मिनाऱ्यांचेदेखील हेच हाल आहेत. मुघलकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून बीबी का मकबरा ओळखला जातो. देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. स्तुती आणि वर्णन ऐकून पर्यटक मोठ्या अपेक्षा ठेवून येथे येतात; पण येथील वाताहत पाहून त्यांचा अपेक्षाभंग होतो हे नक्की. मकबऱ्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शायर बशर नवाज लिहितात, ‘मकबरा गुस्ल करे नूर की फुहारो में, रक्स करती रहे नकहत (खुशबू), इन्हीं गुलजारों में.’ आज खरंच अशी परिस्थिती आहे?