वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळांमधील एकूण २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत रजनी राजधर ठाले प्रथम, अमान सलीम तांबोळी द्वितीय, तर खान हुमैरा फातिमा सईद इकबाल हिने तृतीय पारितोषिक पटकावले. उत्तेजनार्थ पुरस्कार पी. यू. जैन हायस्कूलची अनुष्का सदगुरे हिला देण्यात आला.
ऑनलाइन वाद-विवाद स्पर्धेत १८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. मुलींच्या गटातून प्रथम अपूर्वा अनिल मोरे, द्वितीय रेश्मा रफिक शेख, तृतीय दीपिका रावसाहेब कदम आणि उत्तेजनार्थ रिद्धी दिनेश मोरे यांना बक्षीस देण्यात आले. मुलांच्या गटातून प्रथम प्रणव ज्ञानेश्वर महाजन, द्वितीय प्रज्वल वैभव पाटील, तृतीय जिशान अख्तर शेख आणि उत्तेजनार्थ उजेब जफर शेख याने पटकाविला. विजेत्यांना लवकरच विविध पुरस्कार व रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजन समितीतर्फे मुख्याध्यापक रवींद्र तायडे यांनी कळविले आहे.