लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची मान्सनूपर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, जिह्यातील पूर रेषा आखणी संदर्भात जालना पाटबंधारे विभागाने तात्काळ पूर रेषा पुन्हा आखणीचे काम करुन अहवाल ३१ मे पूर्वी सादर करावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालय यांनी मान्सून कालावधीत पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव होण्यासाठी उपाययोजना कराव्यात व पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स /खाजगी रुग्णालय यांनी प्रशासनास सहकार्य करावे व जनतेची मदत करावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियोजन करावे. पुर या आपत्तीच्या संदर्भात रंगीत तालीम ३१ मे पूर्वी घ्यावी. सदर रंगीत तालीममध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच गाव निहाय पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तिंची यादी तहसीलदारांनी तयार करुन सादर करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत जिल्ह्याची आपत्ती प्रवणता लक्षात घेऊन आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान व आपत्तीपश्चात काय करावे व काय करु नये या विषयीचे मटेरिअल तयार करुन ते सर्व गाव/ग्रामपंचायत स्तरावर तहसीलदार यांचे मार्फत वितरीत करावे. आपत्ती काळात सर्व अधिकारी यांनी त्यांचे मोबाईल चालू ठेवावे व जिल्हा नियंत्रण कक्षा मार्फत येणाऱ्या सूचनेनुसार कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
आपत्कालिन परिस्थितीत प्रशासनास सर्वांचे सहकार्य गरजेचे
By admin | Published: May 17, 2017 12:37 AM