जालना : जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी दुसर्या दिवशी बांधकाम, सिंचन, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, कृषी, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागातील २७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्या करून त्यांना लगेचच आदेश देण्यात आले. सकाळी १० वाजता जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्य उपस्थितीत या बदली प्रक्रियेस प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे यांची उपस्थिती होती. बदली प्रक्रिया दिवसभर सुरू असल्याने अनेक कर्मचार्यांची वर्दळ जिल्हा परिषदेत सुरू होती. तर सभागृहाबाहेरही काही कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकांमधून अगोदर पदोन्नती करण्यात येणार असल्याने त्यांची बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
जि.प.त आठ विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Published: May 21, 2014 12:11 AM