लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही. परिणामी आग लागल्यास अग्निशमन विभागाची धांदल उडते. मनुष्यबळासाठी अनेक साधनांचा अभाव अग्निशमन विभागात दिसून येतो. पूर्वी राज्यशासनाच्या अखत्यारित अग्निशमन विभागा होता. त्यानंतर शासनाने १ सप्टेंबर १९८३ रोजी हा विभाग नगर परिषदेकडे वर्ग झाला. पालिकेकडे ३४ वर्षांपासून हा विभाग असला तरी यात अत्याधुनिक साधानांचा अभाव आहेच. सार्वजनिक तसेच खाजगी मिळून कोट्यवधी रूपयांची मालमत्ता वाचविण्याचे काम या विभागा करत असला तरी तोकड्या साहित्यामुळे विभागाचे कर्मचारी नेहमीच जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे काम करतात.शहराची वाढत लोकसंख्या पाहता असणारे साहित्य कमी आहे. आज जे साहित्य उपलब्ध आहे. त्याच्या दुप्पट ते तिप्पट साहित्य असण्याची गरज कर्मचारी व्यक्त करतात. अग्निशमन दलाकडे तीन बंब आहेत. या बंबावरच शहरातील भिस्त आहे. आज रोजी शहराचा विस्तार पाहता पाच बंब असण्याची गरज आहे. फक्त २१ कर्मचारी आग विझविण्यासाठी तत्पर असतात. ही संख्या सुमारे ५० असण्याची गरज आहे. तीन शिफ्टमध्ये काम करताना तसेच काहींना सुटी घेताना अनेक अडचणी येतात. एकाच वेळी दोन ते तीन आगी लागल्यास अथवा मोठी आग लागल्यास मनुष्यबळ कमी पडते. शिवाय प्रशिक्षित मनुष्यबळ पालिकेने भरण्याची गरज आहे. अनेक दिवसांपासून येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही.
सुविधांअभावी कर्मचाऱ्यांचे ‘अग्निदिव्य’
By admin | Published: May 08, 2017 12:15 AM