लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तिरुपती-निजामाबाद रॉयलसीमा एक्स्प्रेस शनिवारी रुळावरून घसरल्याने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाहतुकीवर परिणाम झाला, तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर बसगाड्यांची तपासणी करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांचे नाताळ सणाच्या सुट्यांचे नियोजन कोलमडले.तिरुपती-निजामाबाद रॉयलसीमा एक्स्प्रेसची एक बोगी सकाळी ८ वाजता हैदराबाद विभागातील कमारेड्डी-निजामाबाददरम्यान घसरल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे नांदेड विभागातून हैदराबादकडे जाणाºया आणि येणाºया रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या घटनेमुळे काचिगुडा-मनमाड पॅसेंजर कमारेड्डी ते मनमाडदरम्यान रद्द करण्यात आली. मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस परळी, विकाराबादमार्गे वळविण्यात आली. दुसरीकडे बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर पुण्याला जाणाºया शिवनेरी बसचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मध्यवर्ती बसस्थानकात दोन शिवनेरी बसची तपासणी करण्यात आली. दुपारी ३ वाजेनंतर पुण्याला जाणाºया प्रवाशांना शिवनेरी बसची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे बस कधी निघणार, असा प्रश्न प्रवासी एसटी महामंडळाच्या अधिकाºयांना विचारत होते. कर्णपुरा येथील मैदानावर दुपारी ३ वाजेपासून थांबलेले शिवनेरी बसचे प्रवासी सायंकाळी ५ वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून शिवशाही बसने पुण्याला रवाना झाले. या घटनेने काहींनी प्रवास रद्द केला, तर काहींनी खाजगी वाहनाने पुण्याला जाण्यास प्राधान्य दिला.देवगिरी एक्स्प्रेस आज रद्दरेल्वे घसरल्यामुळे सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आली. ही रेल्वे रद्द झाल्याने रविवारी (दि. २४) मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:20 AM