शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

लाचप्रकरणी चिंचोलीच्या सरपंचांना सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Published: March 20, 2016 12:36 AM

उमरगा : घरजागेची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद करून त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी चिंचोली काटी (ता़लोहारा) येथील

उमरगा : घरजागेची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद करून त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी चिंचोली काटी (ता़लोहारा) येथील सरपंच हरिश्चंद्र दादासाहेब जेटीथोर याना उमरगा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच दहा हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़ ही कारवाई २५ मार्च २०१४ रोजी करण्यात आली होती़ मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील काटे चिंचोली येथील राजेंद्र पांडुरंग कोळी हे कुसळंब (ता़पाटोदा) येथील खंडेश्वर विद्यालयात सेवक म्हणून कामकाज करतात़ त्यांनी ७ नोव्हेंबर २०१३ रोजी काटे चिंचोली येथील विमलबाई बाबुराव कडदोरे यांच्याकडून ग्रामपंचायतीच्या मिळकत क्रमांक ५५ मधील १६६४ चौ़ फूटाची जागा ९९ वर्षाच्या करारावर घेतली होती़ या करारपत्रानुसार ग्रामपंचायत काटे चिंचोली येथे आठ-अच्या रेकॉर्डमध्ये नाव लावण्यासाठी कोळी यांनी सरपंच हरिश्चंद्र दादासाहेब जेटीथोर यांच्याकडे करारपत्राची छायांकित प्रत व इतर कागदपत्रे ८ नोव्हेंबर २०१३ रोजी दिले होते़ आठ-दहा वेळेस चकरा मारून सरपंच जेटीथोर यांची भेट घेवून कागदपत्रानुसार ग्रामपंचायतच्या आठ-अची नोंद मंजूर करून त्याची प्रत देण्याची विनंती केली होती़ परंतू सरपंचांनी टाळाटाळ करून आठ-अला नोंद केली नाही़ कोळी यांनी २६ नोव्हेंबर २०१३ व १५ जानेवारी २०१४ रोजी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या नावे अर्ज करून आठ-अ ला नोंद करण्याची मागणी केली होती़ त्यानंतर २४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सरपंच जेटीथोर यांनी कोळी हे कुसळंब येथे असताना फोन करून २५ मार्च रोजी १० हजार रूपये आणून द्या मी तुमची आठ -अ ची नोंद मंजूर करून त्याची प्रत तुम्हाला देण्याचे काम करतो, असे सांगितले़ लाचेची मागणी होताच कोळी यांनी उस्मानाबाद येथे एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दाखल केली़ तक्रार दाखल होताच पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी २५ मार्च २०१३ रोजी माकणी येथील ज्यू जयभवानी हॉटेलमध्ये सापळा रचला़ त्यावेळी सरपंच हरिश्चंद्र जेटीथोर यांनी १० हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताच कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा तपास करून उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी उमरगा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़ए़पोतदार यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी सरपंच हरिश्चंद्र दादासाहेब जेटीथोर यांना विशेष न्यायाधीश एम़एस़मुंगळे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक कलम ७ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड व कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपे दंड व दंड न दिल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याचे अ‍ॅड़ एस़ए़पोतदार यांनी सांगितले़