औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधींच्या जागा बळकावल्या जात आहेत. खुलेआम अतिक्रमण होत असताना, त्याकडे लक्ष दिले जात नाही, तसेच दाखल न्यायालयीन प्रकरणात असमन्वय आणि दुर्लक्षामुळे न्यायालयातही नामुष्की होत असल्याने, जिल्हा परिषदेच्या मालमत्ता वाचविण्यासाठी सर्व माहितीसह बैठकीचे पुढील आठवड्यात नियोजनाचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले, तर विधिज्ञ बदलण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जि.प. स्थायी समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सदस्य केशवराव तायडे यांनी मोक्याच्या जागांवर होणारे अतिक्रमण आणि न्यायालयीन द्याव्यांत होणारे दुर्लक्षामुळे कोट्यवधींच्या जागा इतरांकडून बळकावल्या जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली, तर रमेश गायकवाड, किशोर पवार, मधुकर वालतुरे, रमेश पवार, शिवाजी पाथ्रीकर यांनीही यासंबंधी सविस्तर बैठक घेऊन कृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली, तर बांधकाम सभापती यांनीही सध्या होत असलेले अतिक्रमण पाडून मालमत्ता वाचविण्यासाठी बांधकाम विभागाकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले, तर बैठकीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.मंगेश गोंदावले यांनीही