लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीतील (आॅरिक) पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच पाच मजली आॅरिक हॉलची इमारत आॅक्टोबरपर्यंत सज्ज होणार आहे. शेंद्रा व बिडकीन डीएमआयसीतील पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाने आजपर्यंत २ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.अवघ्या मराठवाड्याचे लक्ष शेंद्रा येथील आॅरिक सिटीकडे लागले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप लि.चे सह-मुख्य व्यवस्थापक गजानन पाटील यांनी सांगितले की, आॅरिक सिटीचे काम प्रगतिपथावर आहे.येथील रस्ते, फुटपाथ, पथदिवे, जलनिस्सारण व्यवस्था, पाणीपुरवठ्याची पाईप लाईन, विद्युत पुरवठ्यासाठी सबस्टेशन, इलेक्ट्रिकल केबल टाकणे, अग्निसुरक्षा आणि अग्निशमन यंत्रणा, आदी पायाभूत सुविधांचे ६५ ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.डिसेंबरअखेरपर्यंत ९५ टक्के काम पूर्ण होईल. आॅरिक सिटीत ६३ कि.मी.चे रस्ते तयार करण्यात येत आहेत. संपूर्ण सिटीत फायर फायटिंग पंप बसविण्यात येत आहे. तसेच करमाड व सटाणा येथील दोन मोठे रेल्वे उड्डाणपूल डिसेंबरनंतर वाहनांसाठी खुले होणार आहेत. सटाणा रेल्वे उड्डाणपूल नंतर समृद्धी महामार्गाला जाऊन मिळणार आहे. याशिवाय अंतर्गत १६ लहान उड्डाणपुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. विजेची ५ सबस्टेशन्स उभारली जात आहेत.शासनाने शेंद्रा व बिडकीन डीएमआयसीसाठी ११ हजार कोटी गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यात जमीन अधिग्रहणासाठी ३ हजार कोटी तर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ८ हजार कोटींचा समावेश आहे. आजपर्यंत २ हजार कोटींचा खर्च झाल्याचे पाटील यांनी नमूद केले.आॅरिकमध्ये ५ बहुराष्ट्रीय कंपन्या येणारआॅरिक सिटीमध्ये ५ बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यासंदर्भात सह-मुख्य व्यवस्थापक गजानन पाटील यांनी सांगितले की, पहिला अँकर उद्योग कोरियन ह्योसंग या टेक्सटाईलमधील कंपनीने १०० एकर जागा घेतली आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी ३५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. .मे २०१९ पासून कंपनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. तसेच डायलिसिस यंत्रनिर्मिती करणारी चीनची अग्रगण्य ‘बाएहे’ मेडिकलने १० एकर जमीन घेतली आहे. ११० कोटींची गुंतवणूक कंपनी करणार आहे. याशिवाय चायनीज कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील कंपनी १५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. १० एकर जागेत प्रकल्प उभारणार आहे. याशिवाय अन्य कोरियन, जपानी कंपन्याही आॅरिक सिटीमध्ये गुंतवणुकीस उत्सुक आहेतसर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारणारआॅरिक सिटीमध्ये नागरी वसाहत उभारण्यात येणार आहे. यात सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे विकासकाकडून उभारण्यात येणार आहेत. यासाठी १५ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. यात ६०० स्क्वेअर फुटांचे फ्लॅट असणार आहेत. याशिवाय १६ बंगले व ११ ओपन इंडस्ट्रील प्लॉट व २ कमर्शियल प्लॉटचा समावेश आहे. परवडणाºया घरांच्या योजनेमुळे सर्वसामान्यांनाही आॅरिक सिटीमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
‘आॅरिक’मध्ये ९५% सुविधा वर्षअखेरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:07 AM
बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीतील (आॅरिक) पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच पाच मजली आॅरिक हॉलची इमारत आॅक्टोबरपर्यंत सज्ज होणार आहे. शेंद्रा व बिडकीन डीएमआयसीतील पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाने आजपर्यंत २ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
ठळक मुद्देआजपर्यंत २ हजार कोटींचा खर्च : अधिकाऱ्यांचा दावा