काही महिन्यांपूर्वीच घाटी परिसरात नाईट ड्यूटीसाठी जाणाऱ्या महिला डॉक्टरसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न काही तरूणांनी केला. तिने वेळीच आरडाओरडा केल्याने हे संकट टळले, पण शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
२. पायलट किर्ती राऊत यांचे उड्डाण-
औरंगाबादच्या पहिल्या महिला पायलट किर्ती राऊत यांनी दि. ५ फेब्रुवारी रोजी शहरातून सुरू झालेल्या इंडिगो या विमानाच्या पहिल्यावहिल्या प्रवासाचे उड्डाण केले होते. औरंगाबादसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली.
३. महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग-
औरंगाबाद आणि नाशिक प्रदेशासाठी एसटी चालक पदासाठी ३२ महिलांची निवड झाली होती. दि. ३ फेब्रुवारीपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले होते. परंतू कोरोनामुळे ते प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे. आता पुन्हा प्रशिक्षण कधी सुरू होणार याची प्रतिक्षा आहे.
४. वर्षाच्या पुर्वसंध्येला रंगले कविसंमेलन-
मराठवाडा साहित्य परिषद आयोजित कवयित्रींच्या कवी संमेलनाने साहित्य विषयक कार्यक्रमांची पुन्हा एकदा दमदार सुरूवात झाली. कवयित्रींचे हे संमेलन रंजक ठरले.
५. दामिनी पथकाचे उल्लेखनिय काम-
लॉकडाऊनकाळात महिलांवरील वाढते अत्याचार, कौटूंबिक हिंसाचाराच्या घटना या काळात दामिनी पथकाने उल्लेखनिय काम करत महिलांना अनेक संकटातून मुक्त केले.
पॉईंटर.. याही ठळक बाबी...
१. घाटीमध्ये कोरोनाचे गंभीर रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाकाळात घाटीचे खंबीर नेतृत्व घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांभाळले.
२. कोरोनाकाळात औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रनेची धुरा डॉ. नीता पाडळकर यांनी सांभाळली.
३. हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर सजग महिला संघर्ष समितीतर्फे निषेध.
४. महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व महिला संघटनांचे एकत्रिकरण आणि पोलिस प्रशासनाला निवेदन.
५. २०२० या वर्षात महिला बलात्काराच्या एकूण ७६ घटना नोंदविण्यात आल्या.