औरंगाबाद : स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी, अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्रे पाठवून २०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली. आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.नीलेश अशोक वडमारे (२९, रा. बीड) असे आरोपीचे नाव आहे. तो आस्था कन्सल्टन्सी नावाची फर्म चालवीत होता. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी हा अभियंता असून, तो काही वर्षे पुण्यात नोकरीला होता. दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच असल्याने विविध नोकरी संदर्भ वेबसाईटवर रोज हजारो बेरोजगार नोंदणी करतात. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला. जस्ट डायल डॉट कॉम आणि क्विकर या वेबसाईटवर बेरोजगारांनी टाकलेल्या प्रोफाईलवरून तो त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार तो उमेदवारांना विविध नामांकित कंपनीत नोकरीची संधी असून, तेथील रिक्त पदे भरण्यासाठी कंपनीने त्यांच्या कन्सल्टन्सीला काम दिले असल्याची बतावणी करी. नोकरी हवी असेल तर नोंदणी शुल्क, मुलाखत फीसच्या नावाखाली तो पाच हजार ते साडेसात हजार रुपये घेई. याशिवाय नोकरी लागल्यानंतर पहिल्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगे. त्याच्यावर विश्वास ठेवून सुमारे २०० उमेदवारांनी त्याने दिलेल्या बँक खात्यावर पाच हजार ते साडेसात हजार रुपये जमा के ले. पैसे जमा झाल्यानंतर आरोपी त्यांच्या ई-मेलवर अथवा पोस्टाने संबंधित कंपनीचे बनावट नियुक्तीपत्रे पाठवून देई. अशा प्रकारे आरोपीने तब्बल २०० बेरोजगारांकडून साडेसात लाख रुपये उकळले. बोगस नियुक्तीपत्रे पाठविताना तो संबंधित कंपन्यांचे लोगो वापरी, यामुळे ते नकली आहेत, याबाबतची शंका उमेदवारांना येत नव्हती. मात्र उमेदवार जेव्हा संबंधित कंपनीत नियुक्तीपत्र घेऊन जात तेव्हा त्याच्या पदरी निराशा पडे. बºयाचदा संबंधित कंपनीत रिक्त पदे असतील आणि कंपनीला मनुष्यबळाची आवश्यकता असेल तेव्हा उमेदवारांच्या नशिबाने कंपनीने त्यांना नोकरी दिली तर आपल्या कन्सल्टन्सीमुळेच तुझी निवड झाली, असे सांगून तो उमेदवाराच्या पहिल्या वेतनातील अर्धी रक्कम घेई. आपल्या कंपनीचा लोगो परस्पर वापरून फसवणूक केली जात असल्याचे स्कोडा कंपनीला समजताच त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. सिंह यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक मोहसीन सय्यदइन्कमिंग कॉलला प्रतिबंध असलेला वापरायचा मोबाईल, कर्मचारी कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप यांनी या तक्रारीनुसार तपास करून आरोपी नीलेश वडमारे यास बीड येथून अटक केली. त्याच्या घरातून विविध कंपन्यांची बनावट नियुक्तीपत्रे, मोबाईल आणि बँक पासबुक जप्त केले. आरोपीविरोधात करमाड ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन बीड येथे तो घरातूनच आस्था कन्सल्टन्सी चालवत असल्याचे सांगितले. बेरोजगार उमेदवारांना तो त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात रकमा जमा करण्यास सांगे. तो अभियंता असल्याने त्याचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याने उमेदवारांना तो प्रभावित करीत असे.इन्कमिंग कॉलची सुविधा नसलेला वापरे फोनआरोपी हा अत्यंत चाणाक्ष आहे. तो सतत मोबाईल नंबर बदलायचा. शिवाय फसवणूक झालेले उमेदवार जाब विचारण्यासाठी त्याला कॉल करीत तेव्हा त्याच्या फोनवर इन्कमिंग सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांना समजे. परिणामी आरोपीशी त्यांचा संपर्क होत नसायचा.फसवणूक झालेले सर्वाधिक अभियंते हे मराठवाड्यातीलनीलेशने फसवणूक केलेल्यांमध्ये बहुतेक सर्व अभियंते असून, ते औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बीड, लातूर येथील रहिवासी आहेत. फसवणूक झालेली रक्कम दहा हजाराच्या आत असल्याने एकाही उमेदवाराने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली नाही. मात्र स्कोडा कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली.
नोकरीच्या आमिषाने अभियंत्यानेच गंडविले २०० बेरोजगारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:55 PM
स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी, अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्रे पाठवून २०० सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणाऱ्या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली.
ठळक मुद्देग्रामीण सायबर क्राईम सेलने केली अटक : विविध नामांकित कंपन्यांची बनावट नियुक्तीपत्रे पाठविली