शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

उद्योजकाला थाळीची ऑर्डर दीड लाखाली पडली; ऑनलाईन भामट्याने केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 7:41 PM

cyber crime : मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून दीड लाख रुपये ऑनलाईन पळवले

ठळक मुद्देफेसबुकवरून मोबाईल नंबर मिळवून उद्योजकाने दिली ऑर्डर 

औरंगाबाद : फेसबुकवर नंबर शोधून ऑनलाईन थाळीची ऑर्डर देण्यासाठी कॉल करणे उद्योजकाला दीड लाखात पडले. त्यांच्या नंबरवर कॉल करुन सायबर भामट्याने त्यांना डेबिट कार्डवरुन दहा रुपये पाठविण्यास आणि anyDesk नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायाला सांगून त्यांच्या खात्यातून १ लाख ५० हजार ६९४ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यावर उद्योजकाने पोलिसांत धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार ऋषिकेश मोहन चव्हाण (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, गारखेडा) यांचा वसमत (जि. परभणी) येथे जैविक खताचा कारखाना आहे. काही महिन्यापासून ते औरंगाबादेत राहात आहेत. ४ जून रोजी त्यांनी फेसबुकवर भोज थालीचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि त्या क्रमांकावर कॉल केला. तेव्हा त्यांचा फोन स्विकारण्यात आला नाही. मात्र, काही मिनिटांनी त्यांना अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. तुमची ऑर्डर घेण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डवरुन दहा रुपये पाठवावे लागेल. ही रक्कम तुम्हाला लगेच परत केली जाईल, असे सांगितले. यामुळे चव्हाण यांनी लगेच त्याने दिलेल्या क्रमांकावर ऑनलाईन १० रुपये पाठवले. ही रक्कम पाठविल्यावर त्याने तुमचे पैसे परत करण्यासाठी दोन ओटीपी क्रमांक पाठविले आहेत. ते सांगा असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी त्या अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगितले. यानंतर चव्हाण यांच्या खात्यातून २० हजार १०० रुपये, २५ हजार ९७७ रुपये आणि ४९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याचे मेसेज तक्रारदार यांना प्राप्त होताच त्यांनी त्या अनोळखी मोबाईलधारकाला कॉल केला असता त्याने ही रक्कम चुकून त्याच्या खात्यात वर्ग झाली. ही सर्व रक्कम तुम्हाला परत करतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये anydesk हे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा, असे त्याने सांगितले. तक्रारदार यांनी लगेच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करताच आरोपीने आणखी रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच चव्हाण यांनी सायबर ठाणे आणि पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या सल्ल्याने त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील anydesk ॲप्लिकेशन डीलिट केले .

आजही भामट्याचे कॉलतक्रारदार यांच्या खात्यात पैसे असल्याचे समजताच तक्रारदार यांना आरोपीने शनिवारी पुन्हा कॉल करून रक्कम परत करण्याची ग्वाही दिली. आणि anyDesk अप्लिकेशन डाउनलोड करायचे सांगितले. त्यांनी त्याला नकार देताच आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरुन कॉल करून तो बॅंकेचा अधिकारी बोलत असल्याचे म्हणाला. तुमचे काल गेलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ओटीपी पाठवत आहे तो ओटीपी क्रमांक सांगा असे म्हणाला. मात्र चव्हाण यांनी त्यांना आज प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद