लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या परिस्थितीत कर्मचाºयांचे पाठबळ वाढविण्यासाठी ‘एचआर’ विभागातील अधिकारी एकजूट झाले आहेत.औरंगाबाद एचआर फोरमतर्फे सोमवारी ‘एचआर’च्या सुरक्षेसंदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सोमेन मजूमदार, लक्ष्मण यमगार, ओमप्रकाश कसानिया, शशिकांत जोशी, शरद गीते, सतीश यादव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, चितेगाव औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट होत आहे. त्याबरोबर या क्षेत्राला नवनव्या कलहांना सामोरे जावे लागत आहे. हे कलह कंपन्यांच्या आड येत आहेत.कोणत्याही तणावपूर्ण वातावरणात कर्मचाºयांची काळजी घेण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून केला जातो. यामध्ये कोणत्याही बाधेचा विचार न करता ‘एचआर’ समुदाय एका भिंतीप्रमाणे सर्वात पुढे उभे राहतो. त्यामुळे ‘एचआर’च्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हर्षल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीसाठी प्रशांत कोळेश्वर, योगेश जाधव यांनी प्रयत्न केले.धमक्या, मारहाणीत वाढ‘एचआर’ला अनेक कारणांनी धमक्या येणे, मारहाण होण्याचे प्रकार वाढत आहेत. ज्याप्रमाणे ते लोकांना रोजगार प्रदान करतात, त्याचप्रमाणे कंपनीत शिस्तीचे वातावरण ठेवण्यासाठी काहींना कामावरून बडतर्फ ही करतात.औद्योगिक शांती जपून ठेवण्यासाठी एचआर विभाग प्रयत्न करीत असतो. या विभागातील प्रत्येक जण डॉक्टरांप्रमाणे सेवा देतात. सध्याच्या असुरक्षेच्या वातावरणात कर्मचाºयांचे पाठबळ वाढविणे ही काळाची गरज असल्याचा सूर बैठकीत निघाला.
वाळूज एमआयडीसीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:54 AM