ठळक मुद्देहिंगोली : तालुक्यांना भेटी; विद्यार्थी-नागरिकांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वन्यजीव संरक्षण तसेच वन संवर्धनाचा ग्रीनआर्मी बसद्वारे विद्यार्थी व नागरिकांना संदेश दिला जात आहे. वन विभागातर्फे तालुकास्तरावर बस पाठविली जात असून यावेळी विद्यार्थ्यांना व्हीडीओ क्लीपद्वारे मागदर्शन केले जात आहे.सदर मोहीमेत जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी केले आहे. २४ नोव्हेंबर रोजी ग्रीनआर्मी बसचे हिंगोली शहरात आगमन होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना वन संवर्धन, वन्यजीवां विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. कळमनुरी, वसमत, हिंगोली, औंढानागनाथ सेनगाव आदी ठिकाणी जनजागृती केली जात आहे.