राजेश खराडे, बीडशेतकऱ्यांच्या हिताची व महावितरणच्या वसुलीत वाढ होण्याच्या दृष्टीेने राज्य शासना अंतर्गत राबविण्यात आली होती. कृषी संजीवनी योजेनेला जिल्ह्यातून केवळ ११ टक्केच शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडला आहे. आॅगस्ट ते आक्टोबर महिन्यादरम्यान राबविण्यात आली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी पन्नास टक्के बीलाचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के बील माफ व विलंब आकार माफ करीत रक्कमेवरील व्याजही संपूर्ण माफ करण्यात येत होते. या हितकारी योजनेकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वीजबील भरणा करण्याची मानसिकताच नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून कृषी संजीवनी योजनेअंतर्गत वीज बील वसुलीचे सुमारे १६३ कोटींचे उद्दीष्ट होते मात्र प्रत्यक्षात फक्त महावितरणाकडे योजनेअंती केवळ १२ कोटी ७७ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कृषी संजीवनी योजना सपशेल फोल ठरली असल्याचे दिसत आहे. अंबाजोगाईकरांनी घेतला लाभजिल्हयात केवळ अंबाजोगाई तालुक्यानेच योजनेचा लाभ घेतला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण १८६४८ लाभार्थ्यापैकी अंबाजोगाई तालुक्यातून ५२९३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर योजनेअंतर्गत वसुली ही २ कोटी ९० लाख ऐवढी असल्याने सर्वात जास्त वसुली ही याच तालुक्यातून झाली आहे. तर सर्वात कमी ५२१ लाभार्थी हे शिरूर कासार तालुक्यातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.जनजागृती करूनही ‘जैसे थे’ च परिस्थिती जिल्ह्यातील अधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा याकरिता महावितरण कंपनीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ध्वनीक्षेपनाद्वारे प्रत्येक तालुक्याच्या ठिाकाणी जनजागृती करण्यात आली होती. योजनेची माहिती होण्यासाठी ग्राहकांना वीज बीलासोबत योजनेची माहितीपुस्तिका देण्यात आली होती. मात्र जनजागृतीचा फारसा परिणाम शेतीपंप धारकांवर झाला नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात ‘कृषी संजीवनी’चा उडाला बोजवारा
By admin | Published: November 16, 2014 11:09 PM