सफियाबादवाडी येथील पोपटराव रंगनाथ जाधव यांनी त्यांच्या शेतात उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस तोडणीला आला होता. या शेताच्या जवळून महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांचे शॉर्ट सर्किट होऊन सुरुवातीला उसाच्या पाचटाला आग लागली. यानंतर संपूर्ण ऊस आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाला. उसासोबत ठिबक संचही जळून गेल्याने शेतकरी जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खांबावरील विद्युत तारा शेतात लोंबकळत आहेत. याबाबत वायरमनला वेळोवेळी कळवूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे.
फोटो : सफियाबादवाडी येथील शेतकऱ्याचा जळून गेलेला ऊस.
260221\babasaheb radhakishan dhumal_img-20210222-wa0095_1.jpg
सफीयाबादवाडी येथील शेतकऱ्याचा जळून गेलेला ऊस.