भरोसे यांचे निवेदन : तावडे यांच्याकडे मागणी |
परभणी : जिल्ह्यातील आरोग्य सेवेची उणीव भरुन काढण्यासाठी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या घटकांची संख्या मोठी आहे. मागासवर्गीय, शेतकरी कुटुंबाचे प्रमाण जिल्ह्यात बहुसंख्येने आहे. परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी जमीन शासनाकडे उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयाकडेही मोठय़ा प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे सुरु झाल्यास रुग्णांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. यापूर्वी अंबाजोगाई येथील शासकीय महाविद्यालयाच्या एक सदस्यीय समितीने शासनाकडे परभणी बाबतचा अनुकूल प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जनतेचा विचार करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभाण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. |
परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा
By admin | Published: February 26, 2016 11:29 AM