लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातून सार्वजनिक न्यास नोंदणी विभाग व जिल्हा पोलीस प्रशासनाकडे १ हजार ५७५ गणेश मंडळांनी नोंदणी केली होती. जिल्हाभरात १६३८ मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी जिल्हाभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेश मूर्तीच्या स्थापनेलाच जिल्हाभरात पावसाने हजेरी लावल्याने गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांचा आनंद द्विगुणित झाला. जिल्ह्यात शहरी भागामध्ये ४५८ तर ग्रामीण भागात ११८० अशा एकूण १६३८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरी भागात नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवानाधारक ३७ व विनापरवाना २२ अशा एकूण ५९ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवानाधारक ४८ , कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण २९ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना झाली आहे. यामध्ये परवानाधारक २३, विना परवानाधारक ६ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. यामध्ये १३ गणेश मंडळांनी परवाना घेतला आहे. तर पाच मंडळांनी परवान्याकडे दुर्लक्ष केले आहे. पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये परवानाधारक १८ तर विना परवानाधारक ७, पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. यामध्ये ५ परवानाधारक तर १६ विना परवानाधारक, चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. तर यामध्ये २ गणेश मंडळांनी परवाना काढला तर १ गणेश मंडळाचा परवाना नाही. सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३९ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ७ परवानाधारक तर ३२ विनापरवानाधारक, मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५, गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. ३५ परवानाधारक आणि १० विनापरवानाधारक गणेश मंडळे आहेत. बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत ९ (६ परवानाधारक), ३ (विनापरवानाधारक), गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ (३५ परवानाधारक) २० (विनापरवाना) सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ (५ परवानाधारक), (१४ विनापरवानाधारक) सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. ग्रामीण भागातील पिंपळदरी, बामणी, बोरी, चारठाणा, चुडावा, ताडकळस, दैठणा, परभणी ग्रामीण इ. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११८० गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यातील ५२५ गणेश मंडळाकडे परवाना आहे. तर ६५५ गणेश मंडळांकडे परवाना नाही. दहा दिवसांच्या या उत्सवाला जिल्ह्यात प्रारंभ झाला असून, विविध कार्यक्रम होत आहेत.
जिल्ह्यात १६३८ गणेश मंडळांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:03 AM