औरंगाबाद : शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून, या उपक्र माचे पालकत्व लोकनीती मंचने स्वीकारले आहे, अशी माहिती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी कळविली.समलिंगी संबंधांबाबत कलम ३७७ मधील फौजदारी गुन्ह्याचे कलम काढण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने घेतला. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, तसेच देशातील पहिला समलिंगी गौरव मोर्चा कोलकत्यात निघाला, त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन बाबींचे औचित्य साधून शहरातील २५ समलिंगी एकत्र आले आहेत. त्यांनी औरंगाबाद समलिंगी मित्रमंडळ (एल.जी.बी.टी.फे्रंडस् क्लब, औरंगाबाद) ची स्थापना केली आहे. समलिंगींच्या समस्या जाणून घेणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांना समाजात मिसळण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. शहरात ५०० च्या आसपास समलिंगींचा आकडा असल्याचे कळविण्यात आले आहे. समलिंगींनी या मंडळात सहभागी होण्यासाठी फेसबुक, ई-मेल आयडी देण्यात आला आहे. समलिंगींना समाजात प्रकट होणे अवघड जाते. यासाठी समलिंगींनी उमरीकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:33 PM