संचारबंदीत भटकणाऱ्या १७२ जणांची तपासणी, ६ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : संचारबंदीत सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर अजिबात पडू नये, अशी ताकीद प्रशासनाकडून देण्यात आलेली असतानाही काही नागरिक रस्त्यांवरून भटकंती करीत आहेत. रविवारी महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तब्बल १७२ नागरिकांची कोरोना तपासणी केली. त्यामध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचप्रमाणे शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ३८ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
महापालिकेकडून ३७२९ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी शहरात ३ हजार ७२९ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी केली. अँटिजेन पद्धतीने १ हजार ९७२ जणांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल ११३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. १ हजार ७५७ नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सोमवारी सकाळी महापालिकेला त्यांचा अहवाल प्राप्त होईल.