वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आळंद ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामसुरक्षा दलासाठी गावातील युवकांची निवड करण्यात आली. निवडलेल्या सदस्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामसुरक्षा दलाचा लोगो असलेले ड्रेस, ओळखपत्र इत्यादी साहित्य देण्यात येणार आहे. या सदस्यांनी रात्रीच्या वेळी गावात गस्त घालणे, वेळप्रसंगी नागरिक व पोलिसांची मदत करणे, इत्यादी जबाबदारी देण्यात आली आहे. वडोदबाजार ठाण्यांतर्गत सर्वच गावांत ग्रामसुरक्षा दल स्थापन केले जाणार असल्याचे सपोनि. आरती जाधव यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच वर्षा राजू तायडे, माजी उपसरपंच जगन दाढे, नामदेव पायगव्हाण, पोलीसपाटील साहेबराव चोपडे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा वैष्णव, जितेंद्र तायडे, सोमिनाथ भालेराव, कैलास गायके, आजिनाथ गायके, शेख अलीम, लक्ष्मण पायगव्हान, भगवान पायगव्हान, आजिनाथ गायकवाड आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : आळंद येथे सपोनि. आरती जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
240621\gyaneshwar chopde_img-20210624-wa0025_1.jpg
आळंद येथे सपोनि. आरती जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.