शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

'या' संसर्गजन्य आजारामुळे दोन पाळीव घोड्यांना दयामरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 5:20 PM

महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांचीही तपासणी सुरू केली आहे. 

ठळक मुद्देया आजाराची लागण नागरिकांना होऊ शकते.महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सध्या ८२ घोडे आहेत.

औरंगाबाद : कोकणवाडी भागात दोन पाळीव घोड्यांना ग्लँडर्स आजाराची लागण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी तातडीची बैठक घेऊन दोन्ही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेतला. या आजाराची लागण नागरिकांना होऊ शकते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांचीही तपासणी सुरू केली आहे. 

घोडा, गाढव आदी प्राण्यांमध्ये ग्लँडर्सची लक्षणे अलीकडे आढळून येत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या माणसांनाही रोगाची लागण होऊन मृत्यू होऊ शकतो. पशुसंवर्धन विभागाला शासनाने सतर्कतेचा आदेश दिला. त्यानंतर या विभागाने शहरातील घोड्यांची तपासणी सुरू केली. कोकणवाडीतील जनार्दन तांबे यांच्या दोन पाळीव घोड्यांना ग्लँडर्स या आजाराची लक्षणे असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाली होती. त्यानुसार रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली असता, त्यांना ग्लँडर्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या घोड्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा गंभीर आजार असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, सहायक आयुक्त डॉ. डी.एस. कांबळे, वल्लभ जोशी, डॉ. राठोडकर, महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एस. नाईकवाडे यांच्या समितीने या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी या दोन्ही घोड्यांना इंजेक्शन देऊन मारले जाणार असल्याचे डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी सांगितले.

परिसरात तपासणीमहापालिकेच्या आरोग्य विभागाने कोकणवाडी परिसरात सर्वसामान्य नागरिकांचीही तपासणी सुरू केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

शहरात ८२ घोडे... महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सध्या ८२ घोडे आहेत. दोन घोड्यांना ग्लँडर्स या भयंकर रोगाची लागण झाल्यामुळे आता इतर घोड्यांची तपासणी केली जात आहे. शहराच्या अनेक भागात पाळलेले घोडे लग्न समारंभासाठी भाड्याने दिले जातात.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका