शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मृत्यूनंतरही ‘ते’ अवयवदानातून आजही कुठेतरी जिवंत; नातेवाईकांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 1:41 PM

४ वर्षांत २५ जणांचे अवयवदान, अनेकांना नवे आयुष्य

ठळक मुद्देदरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन पाळण्यात येतो. आई-वडील  म्हणतात, मुलगा इतरांच्या रूपात

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोणाला हृदय हवे होते, कोणाला किडनी, तर कुणाला यकृत. मराठवाड्यात गेल्या ४ वर्षांत २५ जणांनी या जगातून जाताजाता अवयवदानाच्या रूपाने इतरांना नवे आयुष्य दिले. त्यामुळे मृत्यूनंतरही  ‘ते’ आजही कुठेतरी आहेत, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. 

दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन पाळण्यात येतो. यानिमित्त अवयवदान झालेल्या व्यक्तीच्या (ब्रेनडेड) आणि अवयव प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.मराठवाड्यात औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. त्यानंतर  २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण झाले.

मराठवाड्यात २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत २५ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. त्यातून अनेकांना नवीन आयुष्य मिळाले; परंतु यावर्षी अवयवदानाला कोरोनाने खीळ बसली आहे.  ७ महिने उलटूनही आतापर्यंत एकही अवयवदान झालेले नाही. अवयवदान आणि प्रत्यारोपण करण्यासाठी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार न करणारे डॉक्टर, रुग्णालय मिळणे अशक्य आहे. अन्य जिल्ह्यात अवयव पाठविण्यास अडचणी आहेत. 

२३० रुग्णांना प्रतीक्षा किडनीचीमराठवाड्यात २३० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. याबरोबरच ७० रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. कोरोनामुळे अवयवदान थांबल्याने अवयवांसाठी गरजू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यारोपणासाठी वेळीच किडनी, यकृत प्राप्त होत नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात येत आहे.

साडेसहा वर्षांची मुलगी घेतेय मोकळा श्वासऔरंगाबादेत जून २०१८ मध्ये झालेल्या १५ वर्षीय ब्रेनडेड मुलाच्या अवयवदानाने जालना येथील साडेचार वर्षांच्या मुलीला हृदय मिळाले. आता ही मुलगी साडेसहा वर्षांची झाली आहे. तिचे वडील म्हणाले, हृदय मिळण्यापूर्वी एक एक श्वास विकत घेतल्याप्रमाणे ती जगत होती; परंतु आता ती मोकळा श्वास घेत आहे. हे कोणाच्या तरी अवयवदानानेच शक्य झाले आहे.

आई-वडील  म्हणतात, मुलगा इतरांच्या रूपातअपघातात ब्रेनडेड झालेल्या १५ वर्षीय प्रतीकच्या अवयवदानाने इतरांना जीवदान मिळाले. त्याच्या जाण्याने त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला; परंतु अवयवांच्या रूपात आजही तो कोणामध्ये तरी आहे, याचे त्यांना समाधान आहे, असे प्रतीकचे नातेवाईक लिंबाजी वाहूळकर म्हणाले.

डॉक्टर, रुग्णालयाची अडचणकोरोनाच्या परिस्थितीमुळे अवयवदानात अडथळा येत आहे. अवयवदानासाठी, प्रत्यारोपणासाठी कोरोनाचे रुग्ण न हाताळणारे डॉक्टर, रुग्णालय मिळणे अशक्य आहे. प्रत्येक रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे अवयवदान पुन्हा सुरू होण्यासाठी काही कालावधी लागेल.- डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी 

अवयवदानाचे            प्रमाणवर्ष        अवयवदान२०१६        ९२०१७        ६ २०१८        ७ २०१९        ३ एकूण        २५ 

टॅग्स :Organ donationअवयव दानAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य