शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही‘घाटी’च्या अधिष्ठाता पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:02 AM

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक ...

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे त्यांनी दोन डोस घेतले होते, त्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डाॅ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, ११ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल शुक्रवारी कोरोना पाॅझिटिव्ह आला. उपचारासाठी त्यांना घाटीत दाखल करण्यात येणार होते. मात्र, घाटीत ऑक्सिजन खाटा आहेत. कारण येथे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. डाॅ. येळीकर यांना कोणताही त्रास नाही. एखादा ऑक्सिजन बेड वाया घालविण्यापेक्षा तो गरजू रुग्णाला मिळाला पाहिजे, यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन डाॅ. येळीकर यांनी केले आहे.

लसीकरणामुळे गंभीर लक्षणे टळण्यास मदत

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. हा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ ते १५ दिवसांनी अँटिबाॅडीज तयार होतात. त्यातून गंभीर लक्षणे टळतात. त्यामुळे लसीचा निश्चितच फायदा होत असल्याचे घाटीतील लसीकरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.