औरंगाबाद : उन्नती डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर प्रा. लिमिटेडच्या ६९ विद्यार्थ्यांना मागील वर्षभरात विविध नामांकित आयटी कंपन्यात नोकरी मिळाली.
त्यातील ८ विद्यार्थ्यांना रेड हॅटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली. यात शिवानी बिरादार, भाग्यश्री पांचाळ, वैष्णवी देशपांडे, सायली गारुळे, श्रद्धा जावळे, स्नेहल डाळे, दिव्या शाह, पारस पंढरीया यांचा समावेश आहे. उन्नती डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर ही संस्था मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद व नाशिक येथे रेड हॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सर्टिफाईड इंजिनिअर, सर्टिफाईड ॲडमिनिस्ट्रेटर, ओपनशिप्ट, अँसिसिबल, क्लाऊड, अशा विविध प्रमाणपत्रावर आधारित प्रशिक्षण देत आहे.
कोरोना काळात जेथे अनेकांनी नोकऱ्या गमाविल्या तिथे उन्नतीच्या विद्यार्थ्यांना भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. फेब्रुवारी ते मे २०२१ या काळात उन्नतीच्या २८ विद्यार्थ्यांना विविध आयटी कंपनीत नोकरी मिळाली आहे. तर मागील वर्षभरात ६९ विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यात उन्नतीचा मोठा वाटा आहे.
कोविड काळातही उन्नतीच्या माध्यमातून आशुतोष भाकरे, अंकुश काथार व पवन वानखेडे यांनी विविध वेबिनार व वर्कशॉप घेतले त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला.
कॅप्शन
उन्नती डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर प्रा. लिमिटेडचे हेच ते ८ विद्यार्थी ज्यांनी रेड हॅट या आयटी कंपनीत नोकरीची संधी प्राप्त केली.