छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्ष थेट काँग्रेससोबत युती करू शकत नाही, यामुळे ते अशा प्रकारे काँग्रेसमधील नेते पक्षात घेत आहेत. असे कितीही नेते तुम्ही पक्षात घेतले तरी लोकसभा निवडणूकीत तुम्हाला २०० पेक्षा जागा मिळणार नाही, असे खडेबोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे भाजपला सुनावले. तसेच देशातीलच नव्हे तर अमेरिकेचे जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना भाजपत आणले तरी इथे फरक पडणार नाही. इथे शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा खा. राऊत यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा पार पडली. ठाकरेसोबत राऊत काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते. आज मंगळवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी देशाला काय तोंड दाखवणार? खोटे पणाचा चेहरा राहिला आहे. नांदेमधील सभेत कारगिल युद्धातील शहिदांच्या कसा अवमान केले हे मोदींनी सांगितले होतं. आणि आज काय झालं शहिदांचा अपमान धुऊन काढला का? त्यांना भाजपमध्ये घेऊन असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. काँग्रेस बरोबर थेट युती करायचं टाळून अशा पद्धतीने पद्धतीने युती करत आहेत. मात्र अशा पद्धतीने आगामी निवडणुकीत ते २००पेक्षा अधिक जागा मिळू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन, आदर्श घोटाळा कसा झालं हे समजावले यानंतर मोदी काय बोलले होते, हे पाहून कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा विचार येतो.
शिंदेसोबतच सोडणार होते पक्ष अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही. कालपर्यंत जागा वाटप करत होते .दोन वर्षापूर्वी शिंदे सोबत पक्ष सोडणार होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून चव्हाण धडपड करत आहे. ते अत्यंत हुशार प्रशासक आहेत. संघटनात्मक बाबींवर त्यांची पकड होती. मात्र, हा निर्णय त्यांच्या स्वतःसाठी धोक्याचा असल्याचेही राऊत म्हणाले.