शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

बाजारात येण्याआधीच १ कोटी १५ लाखांचा कालबाह्य किटकनाशक व खताचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:41 AM

कृषी अधिकाऱ्यांची कारवाई : शरणापूर -माळीवाडा शिवारातील गोदामावर छापा

दौलताबाद ( औरंगाबाद ) : कालबाह्य झालेले कीटकनाशक व खते अनाधिकृतपणे साठवून त्याची नवीन पॅकींग सुरु असतानाच कृषी अधिकाºयांनी गोदामावर छापा मारला व बाजारात जाण्याआधीच जवळपास एक कोटी पंधरा लाखाचा साठा जप्त केला.

ही कारवाई औरंगाबाद -नाशिक महामार्गावरील शरणापूर -माळीवाडा रस्त्याच्या १०० फुटावर गट नं. ७८ मधील गोदामात करण्यात आली. गणेश गवते यांनी हे गोदाम भाडे तत्वावर दिलेले असून या गोदामावर सेजल ग्लास पावडर बनवणा-या कंपनीचा बोर्ड लावलेला आहे. ही कंपनी मागच्या बाजूला चालू असून गोदामाच्या अर्ध्या भागामध्ये प्लायबोर्ड लावून कीटकनाशक व खताचा साठा होता. याकडे कुणाचेही लक्ष जात नव्हते. येथे कालबाह्य झालेला किटकनाशक व खताचा साठा पिशव्यांमध्ये भरुन जणू नवीन साठा आहे, अशी पॅकींग करण्याचे काम सुरु होते. याची गुप्त माहिती कृषी अधिका-यांना मिळाली.

शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून या भागात अधिका-यांनी सापळा लावला व खात्री पटल्यानंतर लगेच छापा मारला. यावेळी मोठ्या प्रमाणात नकली बी-बियाणे आढळून आले, परंतु तेथे कुणीही इसम हजर नव्हता. या घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोजमाप घेण्यात आले. रात्र जास्त कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे मोजमाप करणे शक्य नव्हते. यानंतर रात्री तीन वाजता कंपनीला टाळे ठोकण्यात आले. शनिवारी दुपारी पुन्हा कृषी अधिकारी व कर्मचा-यांनी मोजमाप करण्यास सुरुवात केली. यात सील करण्यासाठी लागणारी मशीन व मोजमाप करण्यासाठी लागणारा इले. वजनकाटा, अनेक कंपनीचे लेबल असलेल्या पॅकींगच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. सापडलेला मुद्देमाल प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. सुदैवाने हा साठा बाजारात आला नाही. नाही तर अनेक शेतक-यांची फसवणूक झाली असती.प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर कारवाई

प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. गोदामावर छापा मारला तेव्हा तेथे कुणीही नव्हते. रात्री उशिरापर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कृषी अधिकारी यातील आरोपींचा शोध घेत असल्याने त्यांची नावे कळू शकले नाहीत. ही कारवाई कृषी अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी आशिष काळुसे, पंचायत समिती कृषी अधिकारी दिनकर जाधव, रोहिदास राठोड, तालुका कृषी अधिकारी राम बेंबरे, सुदर्शन मातीमवार, शकील पटेल, चितळेकर यांनी यशस्वी केली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी