शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दुपारच्या आनंदावर संध्याकाळी विरजण; लॉकडाऊन ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 12:57 PM

प्रशासकीय वर्तुळात कनिष्ठांपासून वरिष्ठ ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

ठळक मुद्दे अनलॉक करण्याच्या घोषणेच्या टर्न आणि यु-टर्नने संभ्रमजिल्ह्यात सर्व मिळून ३ हजार ४५८ पैकी अंदाजे २ हजार ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पॉझिटिव्हिटी रेट कमी होत ३१ मे रोजी २.८३ वर आला. सध्या २.२६ टक्के आहे.

औरंगाबाद : राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर कमी असल्यामुळे सर्व काही अनलॉक करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर करताच दुपारनंतर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सगळ्या बाजारपेठेत आनंदाला उधाण आले. त्यांच्या घोषणेचा टर्न संध्याकाळी यु-टर्नच्या रुपात बदलल्यानंतर व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह जनसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले.

सर्वसामान्यांपासून सर्व व्यावसायिकांना सरकारी विसंवादाने बुचकळ्यात पाडल्यामुळे नेमका हा काय प्रकार यासाठी एकमेकांना फोन करून व्यापाऱ्यांनी सत्य काय आहे हे विचारले. प्रशासकीय वर्तुळात कनिष्ठांपासून वरिष्ठ ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. प्रत्येकाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे बोट दाखवून हात वर केले.

दुपारी अनलॉकची बातमी येताच सर्व क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले होते. हॉटेल चालकांनी तातडीने साफसफाई करण्यास सुरूवात केली. तर शहरातील सर्व मॉलच्या आवारात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शासन निर्णयाबाबत उत्सुकतेने विचारणा केली. जिल्ह्यात सध्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यापारास मुभा दिलेली आहे. बहुतांश जणांनी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला संपर्क करून जिल्ह्यात सर्व काही उघडणार आहे काय, याची माहिती घेतली. मात्र सायंकाळी अनेकांची निराशाच झाली.

३४५८ पैकी २ हजार ऑक्सिजन खाटाजिल्ह्यात सर्व मिळून ३ हजार ४५८ पैकी अंदाजे २ हजार ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर प्रशासनाने ऑक्सिजन खाटांची उपलब्धता किती आहे, याची माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घटएप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.४४ टक्के एवढा होता. तो मागील महिनाभरात कमी कमी होत ३१ मे रोजी २.८३ वर आला. सध्या २.२६ टक्के आहे.

लॉकडाऊन जैसे थे राहील- जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेची माहिती संकलित केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर विचारणा केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. औरंगाबादमध्ये लॉकडाऊन ‘जैसे थे’ राहील, याबाबत सीएमओ कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर काही माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कभी खुशी कभी गमजिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले, अनलॉकचा निर्णय येताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पुन्हा निर्णय बदलण्याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे ‘कभी खुशी तर कभी गम’ असा अनुभव आम्ही घेतला. सर्व अनलॉक झाले असते तर आनंदच झाला असता.

या निर्णयामुळे काळजी वाढली होतीएकदम अनलॉक म्हटले असते तर नागरिकांचा भडका उडाला असता. शिवाय हॉटेलमध्ये स्टाफ देखील नाही, पूर्ण सेवा देण्यासाठी. अनलॉकची पूर्वकल्पना दिली तर तयारी करता येईल, असे औरंगाबाद जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद