शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट; दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा विभागीय आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 2:17 PM

corona virus in Aurangabad जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असून, लिक्विड ऑक्सिजनसाठाही जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे.

ठळक मुद्देरेमडेसिविर इंजेक्शनला पर्याय उपलब्ध असणाऱ्या टोसलीझूमॅब इंजेक्शनचा वापर करावा,

औरंगाबाद : सर्व खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असून, त्या रुग्णालयांनी लेखापरीक्षकाचे नाव, संपर्क क्रमांक, रुग्णालय परिसरात दर्शनीस्थळी लावावे; अन्यथा दोषी रुग्णालयांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी येथे आयोजित एका बैठकीत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा सुयोग्य वापरासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असून, लिक्विड ऑक्सिजनसाठाही जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे. परंतु, भविष्यातील परिस्थितीचा विचार करून आताच नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

रेमडेसिविरला पर्यायी इंजेक्शन वापरारेमडेसिविर इंजेक्शनला पर्याय उपलब्ध असणाऱ्या टोसलीझूमॅब इंजेक्शनचा वापर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली. गरज असणाऱ्या रुग्णांनांच ऑक्सिजन लावण्यात यावा तसेच ऑक्सिजन वापरताना अनावश्यक वापर, गळती इत्यादी बाबीचा जाणीवपूर्वक विचार करावा तरच भविष्यातील ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीला आळा घालणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लान्ट उभारावाजिल्ह्यात मुबलक बेड उपलब्ध असून १ हजार आयसीयू बेडदेखील उपलब्ध आहेत. जिल्ह्यात ६१ हजार किलोलीटर लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध आहे. रेमडेसिविर इंजेक्शन साठादेखील जिल्ह्यात ६ हजार इतका आहे. ३० पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी रुग्णालयांनीदेखील ऑक्सिजनकरिता केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट तत्काळ उभारावा, मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यांचे मॉनिटरिंग करण्यात यावे, अशी सूचना केंद्रेकर यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय