शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सत्तेसाठी काय पण ! जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या स्वतंत्र गटाचा कल भाजपकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 2:25 PM

सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देदहा सदस्यांची जुळवाजुळव राजकीय घडामोडींना वेग

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्यासाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती झालेली असली, तरी ती किमान जिल्हा परिषदेत पुढे कायम राहीलच, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. काँग्रेसच्या ११ सदस्यांना सोबत घेऊन एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. सत्तेत असलेली शिवसेनेची साथ सोडायची आणि भाजपसोबत हातमिळवणी करायची. या अनुषंगाने जिल्हा परिषदेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडाभरात यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीच्या मुद्यांवरून काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले. पद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय ऐनवेळी मागे घेतला. निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्तार यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. त्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत जवळीक साधली. नुकतच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांचा एक वेगळा गट स्थापन करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे. या गटासाठी सिल्लोड तालुक्यातून निवडून आलेले चार सदस्य, कन्नडचे तीन सदस्य, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एक सदस्य गळाला लागू शकतो. असे असले तरी वेगळा झालेला हा काँग्रेसचा गट सेनेसोबत राहावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ११ सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या १० सदस्यांची जुळवाजुळव झालेली आहे. कोणता एक सदस्य गळाला लागतो, यासाठी चाचपणी सुरू आहे. अडीच वर्षांनंतर या स्वतंत्र गटातील काही सदस्य थेट भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत, हे विशेष!

सत्ताबदल होण्याची शक्यताजिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता; परंतु शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. सेना-काँग्रेस आघाडीची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली, ती सध्याही आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषदेत हा सत्ताबदल अपेक्षित आहे.  सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जि.प.तील संख्याबळभाजप -     २३शिवसेना -    १८काँग्रेस -     १६राष्ट्रवादी -    ०२मनसे -     ०१रिपाइं -     ०१अपक्ष -     ०१एकूण -     ६२

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस