- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचा (एमआयएम) बायजीपुरा येथील नगरसेवक शेख जफर आणि त्याचा भाऊ शेख बाबर अनेक वर्षांपासून चोरीचे ट्रक आणि हायवा वाहने नवीन करून विकत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी वाहन विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी विकलेल्या वाहनांचे क्रमांक, कुठे विकले याचे पुरावेच ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी फक्त ३ ट्रक जप्त केले आहेत.
चिकलठाण्यातील टाटा बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये अनेक वर्षांपासून चोरीचे वाहन आणून त्याची रंगरंगोटी करण्यात येत होती. वाहनाचा ओरिजनल चेसीस क्रमांक काढून त्यावर बोगस चेसीस क्रमांक गॅस वेल्ंिडगच्या साह्याने लावण्यात येत होता. वाहनाची बीड आरटीओ कार्यालयातून बोगस कागदपत्रांच्या आधारे पासिंग करण्यात येत होती. जफर व त्याच्या भावाने विकलेल्या प्रत्येक वाहनावर बीडचीच पासिंग आहे. त्यांनी वाहनांवर टाकलेले सर्व क्रमांकही बोगस आहेत. जफर याला भिवंडी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-२ ने अटक केली. त्याचा भाऊ बाबर याला गुन्हे शाखेने अटक केली.७० ट्रक जप्त : भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत ७० पेक्षा अधिक ट्रक आणि हायवा जप्त केल्या आहेत. सोमवारी औरंगाबाद पोलिसांनी उस्मानपुरा भागातून एक ट्रक जप्त केला. अटकेत असलेल्या शेख बांधवांनी अद्याप पोलिसांसमोर तोंड उघडलेले नाही. बीड आरटीओ कार्यालयात वाहनांचे पासिंग करून देणारे कोण? याचाही तपास सुरू आहे. विकलेल्या वाहनांचे पैसे वेगवेगळ्या पंटरच्या नावावर बँक खात्यात मागविण्यात येत होते. जफर याचे सर्व निकटवर्तीय पंटरही फरार झाले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, वैजापूर, शहादा, सटाणा, बुलडाणा, नागपूर आदी जिल्हे व राजस्थानमध्ये ही वाहने विकली आहेत.
चोरीचे ट्रक, हायवा कुठे विकले
वाहन क्रमांक प्रकार ठिकाणएमएच-२३-डब्ल्यू ९८४८ हायवा मुंबईएमएच-२३-डब्ल्यू ९६४१ हायवा ठाणेएमएच-२३-डब्ल्यू ९७८९ ट्रक नाशिकएमएच-२३-डब्ल्यू ९७६० ट्रक राजस्थानएमएच-२३-डब्ल्यू ९५४३ हायवा वैजापूरएमएच-२३-डब्ल्यू ७६९९ ट्रक धुळेएमएच-२३-डब्ल्यू ९४०३ हायवा भोकरदनएमएच-२३-डब्ल्यू ९४०४ हायवा वैजापूरएमएच-२३-डब्ल्यू ९९२४ हायवा गंगाखेडएमएच-२३-डब्ल्यू ९३४६ हायवा धुळेएमएच-२३-डब्ल्यू ९९३४ हायवा शहादाएमएच-२३-डब्ल्यू ३६९९ हायवा शहादाएमएच-२३-डब्ल्यू ९५१९ हायवा वैजापूरएमएच-२३-डब्ल्यू २४९९ हायवा धुळेएमएच-२३-डब्ल्यू ९६६९ हायवा सटाणाएमएच-२३-डब्ल्यू ९९८४ हायवा बुलडाणाएमएच-२३-डब्ल्यू ५४३३ हायवा नागपूरएमएच-२३-डब्ल्यू ९४१५ हायवा धुळेएमएच-१८ एए-२९७१ ट्रक गुरुधानोरा
विकलेल्या वाहनांचे पैसे वेगवेगळ्या पंटरच्या नावावर बँक खात्यात मागविण्यात येत होते.मागील चार दिवसांपासून बायजीपुरा भागात राहणारे आणि जफर याचे सर्व निकटवर्तीय पंटरही फरार झाले आहेत. या राज्यस्तरीय रॅकेटमध्ये अनेकांचा समावेश असतानाही पोलिसांनी इतरांना अटक केलेली नाही.