लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पदवी परीक्षांमधील बी.कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सत्रांचे निकाल जाहीर झाले. मात्र, महत्त्वाच्या बी.ए., बी.एस्सी.च्या निकालाची महिना उलटल्यानंतरही प्रतीक्षा कायम आहे. विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांच्या मुंबर्ई- औरंगाबाद वाºया सुरू आहेत.विद्यापीठाच्या महिनाभरापूर्वीच पदवी परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी ३० डिसेंबरपर्यंत सर्व पदवी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. बुधवारी बी.कॉम.च्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील चार सत्रांचा निकाल जाहीर झाला आहे, तर बी.सी.ए., बी.बी.ए. या पदवी अभ्यासक्रमांचे निकालही दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले असल्याचे उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत यांनी सांगितले, तर एलएल.बी.चा निकालही बुधवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी इतरही काही पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले आहेत. मात्र, सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या बी.ए., बी.एस्सी.च्या निकालाची प्रतीक्षाच विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या मागील सत्रावेळी निकालाचा झालेला गोंधळ यावेळी होऊ नये, यासाठी राज्यातील विविध अधिकाºयांची मदत घेण्यात येत आहे.मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडेही मुंबई विद्यापीठाच्या निकालाची काही जबाबदारी सोपावली. यामुळे डॉ. नेटके हे आठ दिवस मुंबई आणि आठ दिवस औरंगाबादेत काम करीत आहेत.डॉ. नेटके यांना पूर्णवेळ मुंबईला पाठविण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी नकार दर्शविला होता. यामुळे आठ दिवसांचा तोडगा काढला आहे. याचा परिणाम परीक्षा विभागाच्या कामावर होत असल्याचे बोलले जात आहे.आगामी परीक्षा अर्जांची मुदत संपलीपदवी अभ्यासक्रमांच्या चालू सत्रातील परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारीच संपली आहे. ही मुदत संपली तरीही पदवीच्या झालेल्या परीक्षांचे निकाल लागले नाहीत. यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरावे लागणार आहेत.बी.कॉम.च्या चार सत्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. बी.ए., बी.एस्सी.चे निकालही लवकरच जाहीर होतील. याचवेळी अभियांत्रिकीच्या एम.सी.ए. इंजिनिअरिंगचे निकाल जाहीर करीत अभियांत्रिकीच्या निकालांनाही प्रारंभ केला आहे.-डॉ. प्रताप कलावंत,उपकुलसचिव
परीक्षा संचालकांच्या वा-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:11 AM