शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

पहिल्या पेपरलाच विद्यापीठ नापास, विद्यार्थ्यांना सापडेना नियोजित केंद्रावर परीक्षा क्रमांक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:47 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली . मात्र, सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपले परीक्षा क्रमांकच नमूद केलेल्या केंद्रावर सापडत नव्हते.

ठळक मुद्देया आधीच ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आले होते या परीक्षेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली . मात्र, सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपले परीक्षा क्रमांकच नमूद केलेल्या केंद्रावर सापडत नव्हते. या आधीच ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आले होते व आता नियोजित केंदारवर परीक्षा क्रमांकच सापडत नसल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियोजनाचा सावळा गोंधळ पुढे आला आहे.  

शहरातील व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यात परीक्षा विभागाचे अपुरे नियोजन पदवी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला पुढे आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनाच्या गोंधळाचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळीच अभ्यास करून परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावर आपला क्रमांक सापडत नव्हता. परीक्षेची वेळ जवळ येत असताना क्रमांक सापडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.  

या परीक्षेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचा शुभारंभ ढिसाळ नियोजनाने झाला. परीक्षा केंद्रांचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आली होती. विद्यापीठ परीक्षेसाठी किमान दोन महिन्यांपासून नियोजन करण्याची आवश्यकता असते. मात्र परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यामुळे योग्य पद्धतीने परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आले नाही. चार दिवसांपूर्वी परीक्षा संचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर परीक्षाा केंद्रांचा आढावा घेताना ज्या महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी बसण्यासही जागा उपलब्ध नाही. अशा महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त विद्यार्थी देण्यात आले होते. तर ज्याठिकाणी सर्व सुविधा आहेत. त्या ठिकाणी अल्प प्रमाणात विद्यार्थी देण्यात आले. याचा परीणाम ऐनवेळी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करावी लागली होती.  यामुळे तब्बल २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आली होती. 

२२४ केंद्रांवर सुरु आहे  परीक्षाविद्यापीठाच्या पदवी परीक्षा तब्बल २२४ केंद्रांवर सुरु आहे.  यात औरंगाबद शहरात ३२, औरंगाबाद ग्रामीणमध्ये ४८, जालना शहर १२, जालना ग्रामीण ३४, बीड शहर १०, बीड ग्रामीण ५१, उस्मानाबाद शहर ९ आणि उस्मानाबाद ग्रामीणमध्ये २८ परीक्षा केंद्र असणार आहेत. या परीक्षात कॉपीमुक्तसाठी १६ भरारी पथके, २२४ सहकेंद्र प्रमख नेमण्यात आले आहेत.

अशी आहे  परीक्षार्थींची संख्याअभ्यासक्रम विद्यार्थी

बी.ए. १,०९,०६१

बी.एस्सी १,०८,३१६

बी. कॉम. ५८,३३५

बीसीएसव इतर २९,७८२

--------------------------

एकुण ३,०५,४९४