लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या वसूल होत असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़परभणी शहरात प्रत्येक आठवड्याला शनिवार बाजार भरविला जातो़ आठवड्याचा बाजार असल्याने तालुक्यासह इतर तालुक्यांतूनही छोटे व्यावसायिक आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात़ खेड्यापाड्यांतून येणाºया या व्यावसायिकांकडून महापालिका ५ ते १५ रुपयांपर्यंत भाडे वसूल करते़ यासाठी मनपाने एक वर्षाचे कंत्राट दिले आहे़ यावर्षीचे कंत्राट साडेतीन लाख रुपयांना सुटले आहे़ हे कंत्राट देताना मनपाने प्रत्येक व्यवसायिकाकडून किती रुपये वसूल करायचे, याचे निर्बंध घालून दिले आहेत़ परभणी येथील शनिवार बाजारात झाडूपासून ते किराणा माल, फळे, भाजी, घरगुती लागणाºया वस्तू अशा सर्वच वस्तुंची विक्री होते़ या व्यावसायिकांना जागेनुसार त्यांचे दर ठरवून दिले आहेत़ रस्त्यावर बसून विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांना पाच रुपये, गाड्यावर फळ, भाज्यांची विक्री करणाºयांना १० रुपये तर बाजारात पाल टाकून व्यवसाय करणाºया व्यापाºयांना १५ रुपये एका दिवसाचे भाडे घेतले जाते़ महानगरपालिकेचा स्टॅम्प असलेली पावतीही या व्यावसायिकांना दिली जाते़२८ आॅक्टोबर रोजी बाजारपेठेत फेरफटका मारला तेव्हा किरकोळ व्यापाºयांकडून पावतीनुसार पैसे घेण्यात आले़ गाडेवाल्यांकडूनही पावतीनुसारच रक्कम वसूल झाली़ मात्र पाल टाकून व्यवसाय करणाºया सर्वच व्यावसायिकांना १५ रुपयांची पावती देवून २० रुपये वसूल करण्यात आले़ जवळपास सर्वच व्यावसायिकांना हा अनुभव आला़ पाल टाकणाºया व्यावसायिकाकडून जास्तीची रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत़ महापालिका ज्यावेळी शनिवार बाजारातील व्यापाºयांकडून वसुली करीत होती़, त्यावेळी प्रत्येक बाजाराच्या दिवशी साधारणत: ९ हजार रुपयांची वसुली मिळत असे़ मात्र कंत्राटदार वाढीव रक्कम घेत असल्याने १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत एका बाजारातून उत्पन्न मिळते़ महापालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे़ मात्र त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे़
किरकोळ व्यापाºयांकडून जास्त रकमेची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:13 AM