शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी; वस्तीत पाणी शिरले, महामार्ग वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 7:03 PM

एकाच दिवसात तब्बल 633 मिलिमीटर पाऊस

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात पावसाने  कहर केला आहे.शुक्रवारी रात्री  सर्व 8 महसूल  मंडळात अतिवृष्टी झाली. एकाच दिवसात तब्बल 633 मिलिमीटर पाऊस पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. शेत जमिनी पाण्यात बुडाल्या आहेत, शेतातील काही पिके वाहून गेली, अनेक पाझर तलाव, माती नाला बांध वाहून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील नलकांडी पूल वरील रस्ता  बनकीन्होळ्याजवळ  वाहून गेला यामुळे या रस्त्यावरील वाहतूक  ठप्प झाली आहे. तालुक्यातील खेळणा, पूर्णा, पालोद, अजिंठा येथील वाघूर नदीला महापूर आला आहे.अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे. 

याशिवाय अंधारी-भराडी-  म्हसला, अनवी राहिमाबाद,  रस्त्यावरील वाहतूक जवळपास  ठप्प  झाली आहे. यामुळे वाहन धारक व प्रवाशांचे हाल होत आहे. परदेशी वाडी व के- हाळा गावाचा पुरा मुळे संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात  यामुळे पाणी आले आहे सलग 14 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतातील पिके आता सडू लागली आहेत. मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरीला कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकरी हताश आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी गावागावात जाऊन नुकसानीची माहिती घेतली व शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

यासोबतच वांगी बुद्रुक येथे पूल वाहून गेल्याने, नदीचे पाणी गावात शिरले यामुळे एकूण 58  घरांची पडझड झाली आहे. शेती पाण्यात बुडाली, लोक उघड्यावर आले आहे, अशी भीषण अतिवृष्टी आम्ही कधी पाहिली नाही अशी माहिती सरपंच महेश पाटील, चंदू साळवे यांनी दिली. 

8 मंडळात अतिवृष्टी...सिल्लोड  67 मिलिमीटर, भराडी  95, अंभई  69 ,                                          अजिंठा 72, गोळेगाव 68,आमठाणा 68, निल्लोड 100,बोरगाव बाजार 84 , एकूण  623 आता पर्यंत तालुक्यात एकूण  1098.51 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी