नागद : येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा झाला. शाळेचे मुख्याध्यापक एच. जे. अहिरराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नागदचे माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य सुभाष महाजन यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीत नागद गावाने केलेली ऐतिहासिक कामगिरी सांगितली. दिवंगत स्वांतत्र्यसैनिक यांनी मोठा लढा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरपंच राजधर अहिरे, शिक्षक बाबासाहेब निकम यांनी देखील संवाद साधला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष मधुकर पाटील, उपसरपंच गीताबाई महाजन, ग्रामपंचायत सदस्य अलका सूर्यवंशी, नामदेव गोठवाल, भोला महाजन, विजय सूर्यवंशी, मयाराम तेवार, राहुल बोरसे, बी. एस. साळवे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ए. जी. सुराशे यांनी केले. पी. आर. सपकाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव अर्जुन पाटील यांनी परिश्रम घेतले.
180921\img-20210917-wa0073.jpg
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रम मधी मार्गदर्शन करताना वक्ते.