शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

वाळूज महानगरमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळ्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:15 PM

Death Body found in Waluj Area : महिलेच्या डोके व हाताजवळ जखमा झालेल्या असून मोठा रक्तस्त्रावही दिसून येत आहे

ठळक मुद्देखुन की अपघात गुढ कायम

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : औरंगाबाद-नगर महामार्गावरील वळदगाव  शिवारातील सर्व्हीस रोडवर आज बुधवार (दि.१४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळयाने खळबळ उडाली आहे. या मयत अनोळखी महिलेच्या डोके व हाताजवळ जखमा झालेल्या असून मोठा रक्तस्त्रावही दिसून आल्याने महिलेचा खून झाला की अपघात या विषयी गुढ कायम आहे. ( Excitement over finding the body of an unidentified woman in Waluj )

या विषयी अधिक माहिती अशी की, नगररोडलगत वळदगाव शिवारात सिडकोच्यावतीने सर्व्हीसरोड करण्यात आला आहे. या सर्व्हीसरोडजवळ वाहनतळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जडवाहने थांबलेली असतात. या सर्व्हीसरोडवरुन बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पंढरपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नानासाहेब रहाटे, सुरज देवरे, ओमकार काळे आदी मार्निंग वॉकसाठी जात असतांना त्यांना एक अनोळखी महिला रस्त्याच्याकडेला रक्तांच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. यानंतर नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात संपर्क साधुन या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोहेकॉ. मोहन पाटील १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.सुमेध जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, ही घटना सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या प्रकाराची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. यानंतर सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी गोरे, पोलिस कर्मचारी केशव बारगजे, वळदगावचे पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, पाटोद्याचे लहु मुचक आदींनी घटनास्थळ गाठुन या अनोळखी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवुन दिला.

खुन की अपघात गुढ कायममयत अनोळखी महिलेच्या डोक्याजवळ खोल जखम झालेले असून हाताच्या कोपराजवळ जखम झालेली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असून रंग गोरा आहे. या महिलेने लालसर रंगाची साडी व निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलाला आहे. घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव झालेला असल्याने या महिलेचा अज्ञात मारकऱ्याने खुन केला की वाहनाच्या धडकेने तिचा मृत्यू झाला याविषयी गुढ कायम आहे.

मयत महिलेचा चेहरा पदराने झाकलाया मयत अनोळखी महिलेचा मृतदेह साडीच्या पदराने झाकलेला होता. या सर्व्हीसरोडवर वाहनतळ असल्याने चालक व क्लिनरची गर्दी असते. या विषयी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्याशी संपर्क साधता असता मयत अनोळखी महिला वेडसर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वेडसर महिलेला वाहनचालक व क्लिनर जेवणही देत असल्याने घातपाताची शक्यता नसल्याचे सांगितले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी