यात्रा महोत्सवात मुनिश्री १०८ आचरण सागर महाराज ससंघ व गणनी आर्यिका विशाश्री माताजी ससंघांची प्रमुख उपस्थिती होती. मेघा संजयकुमार, डॉ. सुगंधचंद कासलीवाल परिवाराच्या वतीने धर्मध्वजारोहण होऊन यात्रा महोत्सव सुरू झाला. यानंतर इंद्र-इंद्राणी डॉ. उषा रमेश बडजाते परिवार यांच्या वतीने मूलनायक संकटहर पार्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक झाला.
साधना महेंद्रकुमार काला यांना शांतिमंत्राचा, दिगंबर क्षीरसागर यांना अर्चनाफळ चढविण्याचा, चंदा प्रकाश कासलीवाल यांना दुग्धाभिषेकाचा, राजकुमार दत्तुलाल सवाईवाला यांना मुनिश्री आचरण सागरजी महाराज व आर्यिका विशाश्री माताजी यांच्या पादपक्षालनाचा तर मंगला गोसावी यांना भगवंताची २७९७ दीपकांनी महाआरती करण्याचा मान मिळाला.
भगवान पार्श्वनाथावर अनेक उपसर्ग झाले तरी त्यांनी ते उपसर्ग शांतपणे सहन केले. तसेच मनुष्यावर सुद्धा संकटे आली तरी त्यांनी घाबरून न जाता त्यांचा सामना करावा, अशा शब्दांत मुनिश्रींनी भाविकांना मार्गदर्शन केले. जैनगिरी क्षेत्राच्या विकासासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित आले पाहिजे, असे आर्यिका माताजी यांनी सांगितले.
सायंकाळी शास्त्रवाचन व आरती झाली. प्रवीण लोहाडे यांनी संचालन केले. महामंत्री देवेंद्र काला यांनी प्रास्ताविक केले. समाजमाध्यमांद्वारे हजारो भाविकांनी भगवंतांचे दर्शन घेतले. यावेळी क्षेत्राचे अध्यक्ष डॉ. रमेश बडजाते, महामंत्री देवेंद्र काला, कोषाध्यक्ष प्रकाश कासलीवाल, एम. आर. बडजाते, अशोक गंगवाल, कमल कासलीवाल, दिलीप सेठी, मनोज चांदीवाल, सुधीर साहुजी, संजय साहुजी, विजय पहाडे, अशोक अजमेरा, जयचंद ठोले, वर्धमान बाकलीवाल यांच्यासह क्षेत्राच्या विश्वस्त मंडळाचीही उपस्थिती होती.
फोटो ओळ :
धर्मध्वजारोहण करून जैनगिरी जटवाडा येथील वार्षिक यात्रा महोत्सवाची सुरुवात करताना भाविक.