शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

खळबळजनक! बनावट आधारकार्डच्या आधारे एकाच भूखंडाच्या दोन रजिस्ट्री

By विकास राऊत | Published: July 22, 2024 8:06 PM

मूळ मालकाची जिल्हाधिकारी, पोलिसांत धाव...

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास येथील मुद्रांक नोंदणी कार्यालयात चिकलठाण्यातील लाखो रुपये किमतीच्या एका भूखंडाची मार्चमध्ये रजिस्ट्री झाल्यानंतर त्याच भूखंडाची बनावट आधारकार्डच्या आधारे दुसरी रजिस्ट्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १८ जुलै रोजी झालेल्या प्राथमिक सुनावणीला मूळ रजिस्ट्रीधारकाविना कुणीही फिरकले नसल्यामुळे मुद्रांक विभागाची यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची विक्री मार्चमध्ये जालन्यातील मूळ मालकाने करून दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ मध्ये रजिस्ट्री करून दिली. रजिस्ट्रीनंतर सातबाऱ्यावर नाव घेण्यासाठी चिकलठाणा तलाठी सजा येथे अर्ज केला. परंतु, मूळ मालकाच्या नावे दुसरी रजिस्ट्री क्रमांक ३५००/२०२४ ही ३१ मे रोजी झाली असून, सातबाऱ्यावर पहिल्या व्यवहारातील नाव घेऊ नये, असा अर्ज आल्याचे समोर आले. मूळ मालकाने स्वत: विकलेल्या मालमत्तेची अडीच महिन्यानंतर ३० लाख रुपयांत विक्रीची रजिस्ट्री झाल्याने मुद्रांक विभागात दुय्यम निबंधक, दलाल, नोटीस पाठविणाऱ्या यंत्रणेचे मोठे रॅकेट असावे, असा अंदाज आहे.

मूळ मालकाची जिल्हाधिकारी, पोलिसांत धाव...भूखंडाच्या मूळ मालकाने जिल्हाधिकारी, पोलिसांकडे धाव घेत बनावट आधारकार्ड, बनावट फोटो, स्वाक्षरी बनावट, सगळे कागदपत्रे बोगस दाखवून एकाच मालमत्तेची सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ येथे नोंदणी करण्यात आली. भूखंडाची दोनदा विक्री केल्याची तक्रार त्यांनी केली. खोटे आधारकार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून खरेदी-विक्रीची नोंदणी मुद्रांक विभागाने प्रमाणित केलीच कशी, कमी मुद्रांक शुल्क घेऊन मालमत्ता विक्रीचा व्यवहार पूर्ण कसा काय केला? हे सगळे प्रश्न मुद्रांक विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

मुद्रांक कार्यालयाची उडवाउडवीची उत्तरेसगळे व्यवहार ऑनलाइन होतात. आधारकार्डधारक मुद्रांक नोंदणीसाठी असतात. त्यांच्या हाताचे ठसे घेऊन स्कॅनिंग हाेते. फोटो घेतले जातात. एकाच भूखंडाची दोनवेळा रजिस्ट्री होत आहे, त्यात आधारकार्ड व त्यावरील व्यक्ती चुकीची आहे. ही बाब मुद्रांक विभागाच्या लक्षात का आली नाही, याची विचारणा मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांना केली असता, त्यांनी तक्रारकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी गांगुर्डे यांना माहिती विचारली असता ते म्हणाले, माहिती घेऊनच प्रतिक्रिया देता येईल.

मुद्रांक विभागाचा डबल गेमअब्दीमंडीचे प्रकरण पूर्णत: गुंतागुंतीचे होते. परंतु, सातबाऱ्यावरील नोंदी पाहून मुद्रांक विभागाने एका रात्रीत नोंदणी उरकली होती. खरे-खोटे तपासणे हे आमचे काम नाही. आम्हाला दस्तनोंदणीतून महसूल मिळाला की आमचे काम संपले, अशी डबल गेमची भूमिका मुद्रांक विभाग घेत असल्यामुळे सामान्यांच्या मालमत्तेचे बोगस मालक होऊन फसवणूक होत आहे. त्यात बाेगस आधारकार्ड बनवून देण्यापासून कायदेशीर नोटीस देण्यापर्यंत साक्षीदार, दलाल, खऱ्या व्यवहाराचे पेपर काढून देणारे दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी सक्रिय असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAdhar Cardआधार कार्डRevenue Departmentमहसूल विभाग