शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यासाठी लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:07 PM

महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून कामे करण्यात आली

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक १२ डिसेंबर रोजी नगरसोल ते नांदेडदरम्यान पाहणी आणि विविध कामांचे उद््घाटन करणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे औरंगाबादरेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून कामे करण्यात आली.

नगरसोल ते नांदेडदरम्यान रेल्वेस्टेशन, संरक्षक भिंत, पादचारी पूल, सिग्नल, रंगकामासह इतर कामांवर चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावा रेल्वे संघटनांच्या पदाधिकाºयांनी केला.

‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा बुधवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. त्यांच्या दौºयामुळे मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रूपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयानिमित्त पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई पाहायला मिळाली. दौरा एक दिवसावर आला तरी रेल्वेस्टेशनवर कामांचा धडाका सुरूच होता. रेल्वेस्टेशनच्या इमारतीवर ठिकठिकाणी अजिंठा लेणीतील चित्र साकारण्याचे काम मंगळवारी सुरू होते. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोरील इंजिनचे रंगकाम आणि सौंदर्यीकरणाचेही काम सुरू होते. दौºयामुळे रेल्वेस्टेशन चकाचक झाले आहे. त्यामुळे आता महाव्यवस्थापक चकाचक रेल्वेस्टेशनची पाहणी करणार आहेत.

रेल्वेस्टेशनवर कोणत्याही त्रुटी निघणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली आहे. तरीही पाहणी करताना महाव्यवस्थापक कोणत्या त्रुटी उघड करणार, याकडे लक्ष लागले आहे.अनावश्यक कामेदक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर विविध कामांवर चार कोटींचा खर्च झाल्याची माहिती अधिकारातून मिळाली आहे. रेल्वेस्टेशनवर इतकी कामे केली असती तर नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी कधी केलीच नसती. चांगल्या फरशा असतानाही बदल्यात आल्या, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे राजकुमार सोमाणी म्हणाले.९ कोटी रुपये खर्चून मॉडेल रेल्वेस्टेशनची इमारत बनविण्यात आली. निरीक्षणाच्या नावाखाली पुन्हा खर्च करण्यात आला. दौºयासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला; परंतु पीटलाईनसाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते. रेल्वेस्टेशनवर दिलेला रंग हा ‘डी’ वर्गातील आहे. त्यामुळे पावसात हा रंग निघून जाईल. गरज नसताना फरशा बदलण्यात आल्या. जुन्या इमारतीतील कोनशिलाही काढण्यात आल्याचा आरोप रेल्वे संघटनांतून होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद