औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवरील आकाशवाणी चौक आजपासून सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.जालना रोडवरील विविध चौकांत होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचा शहरवासीयांना लाभही झालेला आहे. शहरातील जालना रोडवर सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊ या कालावधीत वाहनांची संख्या खूप जास्त असते. या रोडवरील विविध चौकांपैकी आकाशवाणी चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असते. तेथे वाहतूक सिग्नल आहे. शिवाय वाहतूक पोलीस तैनात असतात. असे असूनही वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी गत सप्ताहात हा चौक बंद करण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांना शहर पोलिसांचा हा निर्णय आवडला नव्हता. त्याबाबत रोष व्यक्त होताच पोलिसांना या चौकातील बॅरिकेडस् (पान २ वर)जालना रोडवरील आकाशवाणी चौकात वाहतूक कोंडीची जटिल समस्या बनली आहे. येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी हा चौक सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा पोलीस आयुक्तअमितेशकुमार आणि मनपा अधिकारी, पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने घेतला आहे. सात दिवसांत निघणाऱ्या निष्कर्षावरून पुढील निर्णय होणार आहे. संदीप आटोळे, पोलीस उपायुक्त
आकाशवाणी चौकात ‘कोंडी’चा पुन्हा ‘प्रयोग’
By admin | Published: May 19, 2016 12:03 AM