औरंगाबाद : दुर्बल व वंचित घटकांतील पाल्यांसाठी ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९’ अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी प्राधान्यक्रमानुसार शाळांची वर्गवारी करण्यात व्यस्त असताना काही मनोरंजक घटना समोर आल्या आहेत. जवळपास १२५ पालकांनी मोफत प्रवेशाची संधी न दवडण्यासाठी एकापेक्षा अनेक वेळा ‘आॅनलाईन’ नोंदणी करून वेगवेगळे नोंदणी क्रमांक प्राप्त केलेले आहेत.जिल्ह्यात विनाअनुदानित सर्व मंडळ व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविली जाणार असून, ज्या शाळा शिक्षण अधिकार कायद्याचा भंग करतील, त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार शाळा प्रवेशाचे नियम, निकष, अटींचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सदरील प्रवेश प्रक्रियेनुसार ज्या शाळांमध्ये नर्सरीपासूनचे वर्ग सुरू आहेत, त्यांनी एंट्री पॉइंट हा नर्सरीपासून पकडला पाहिजे, तर ज्या शाळा पहिलीपासून सुरू होतात, त्यांनी पहिली हाच एंट्री पॉइंट पकडला पाहिजे, असे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. सध्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शाळा तसेच (पान ७ वर)
पालकांची अशी ही बनवाबनवी उघड
By admin | Published: May 16, 2016 12:11 AM